VIDEO | अंबरनाथ रेल्वे स्थानकात तरुणाला हृदयविकाराचा झटका, रेल्वे पोलिसाने सीपीआर देत वाचवले प्राण
अंबरनाथ रेल्वे स्थानकात एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि तो थेट बेशुद्ध होऊन जमीनीवर कोसळला. यावेळी तेथे उपस्थित रेल्वे पोलिसाने प्रसंगावधान दाखवत तरुणाचे प्राण वाचवले. रेल्वे पोलिसाने त्या तरुणाला सीपीआर देत त्याचे प्राण वाचवले. ही घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीये. मोहन दास असे त्या रेल्वे पोलिसाचे नाव आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वे स्थानकात एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि तो थेट बेशुद्ध होऊन जमीनीवर कोसळला. यावेळी तेथे उपस्थित रेल्वे पोलिसाने प्रसंगावधान दाखवत तरुणाचे प्राण वाचवले. रेल्वे पोलिसाने त्या तरुणाला सीपीआर देत त्याचे प्राण वाचवले. ही घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीये. मोहन दास असे त्या रेल्वे पोलिसाचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर 15 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. सकाळी 11 वाजताच्या सुमारास महेश सुर्वे नावाचा 22 वर्षीय तरुण प्लॅटफॉर्मवर असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं आणि तो खाली कोसळला. यावेळी तिथे उपस्थित रेल्वे पोलीस कर्मचारी मोहन दास यांनी तिथे धाव घेत महेश सुर्वे याला सीपीआर पद्धतीने प्राथमिक उपचार दिले. त्यामुळं काही वेळातच महेश हा शुद्धीवर आला.
ही घटना रेल्वे स्थानकात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. त्यानंतर इतर प्रवाशांच्या मदतीने महेश याला रेल्वे स्थानकातील दवाखान्यात नेण्यात आलं. तिथे प्राथमिक उपचार करुन त्याला नातेवाईकांसोबत घरी पाठवण्यात आलं. रेल्वे पोलिसाच्या तत्परतेमुळे प्रवाशाचे प्राण वाचल्यानं सध्या रेल्वे पोलीस मोहन दास यांचं कौतुक होतंय.
पाहा व्हिडीओ –
Video | रेल्वे ट्रॅकवर 10 वर्षीय मुलाचा अपघात, जिवाची बाजी लावत रुग्णालयात केले दाखल, पोलीस शिपायाचे कौतूक https://t.co/vg5eXiwJvV#ViralVideos | #Vasai | #Railway
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 21, 2021
संबंधित बातम्या :