VIDEO: आदित्य ठाकरेंच्या बर्थडेला डोंबिवलीकरांची चांदी; एका रुपयात 1 लीटर पेट्रोल
ध्या मुंबईसह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा (Petrol) प्रतिलीटर दर 100 रुपयांच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे हे स्वस्त पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर दुचाकीच्या रांगा लागल्या आहेत.
डोंबिवली: राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून माफक दरात पेट्रोल वाटप केले जात आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांची चांगलीच चांदी झाली आहे. डोंबिवलीच्या उस्मा पेट्रोल पंपावर अवघ्या एका रुपयात 1 लीटर पेट्रोल दिले जात आहे. सध्या मुंबईसह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा (Petrol) प्रतिलीटर दर 100 रुपयांच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे हे स्वस्त पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर दुचाकीच्या रांगा लागल्या आहेत. (One liter petrol in one rupees in Dombivli)
पेट्रोल दरवाढीसाठी केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहे. शिवसेनेकडून हा मुद्दा वारंवार मांडण्यात आला आहे. आज आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक रुपये दराने एक लिटर पेट्रोल देऊन शिवसेनेच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे केंद्र सरकारला चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपक्रम युवा सेनेचे पदाधिकारी योगेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे शहर प्रमुख राजेश मोरे राजेश कदम उपस्थित होते.
मुंबईत युवासेनेकडून मोफत कोरोना लस
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना मोफत लस देण्याचा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी कोरोना लस टोचून घेतली.
आदित्य ठाकरे वाढदिवस साधेपणाने साजरा करणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस 13 जूनला तर राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जूनला आहे. मात्र राज ठाकरे यांनी 14 जून रोजी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने कुटुंबासोबतच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आदित्य ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता.
आदित्य ठाकरे यांनी पत्रक प्रसिद्ध करुन याबाबतची माहिती दिली. यामध्ये आदित्य ठाकरे म्हणतात, राज्यासह जगावर कोरोनाचं संकट आहे. आपण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून त्याचा सामना करत आहोत. या कोरोनावर मात करणं हे आपलं ध्येय आहे. 13 जूनला माझा वाढदिवस आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलं आहे. तुम्ही जिथे असाल, तिथूनच मला शुभेच्छा द्या, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रकात म्हटले होते. (One liter petrol in one rupees in Dombivli)