ते मंत्री म्हणाले, ‘लॉबिंग प्रत्येक खात्यात असतं’, मीरा बोरवणकर यांचा आणखी एक बॉम्ब?
माजी आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकावरून अजित पवार यांच्याभोवती आरोपांचे वादळ घोंघावू लागले आहे. यातच मीरा बोरवणकर यांनी एका नवा बॉम्ब फोडलाय. माझ्याआधी सत्यपाल सिंह अधिकारी होते. त्यांनी जागा का हस्तांतर केली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
नवी दिल्ली : 16 ऑक्टोबर 2023 | माझ्या पुस्तकात एकूण ३८ चॅप्टर आहेत. काही सुरुवातीचे चॅप्टर आहेत ते इग्नोर करु नका. काही विशेष केलेले तपास त्यात आहेत. पण, मला एकाच चॅप्टरसंदर्भात सारखं विचारण्यात येतं. अजितदादा यांचं नाव कुठेही पुस्तकात घेतलं नाही. त्यांचं म्हणणं असं होत की प्रोसेस पूर्ण झाली तुम्ही जागा हस्तांतर करा. मी जागा हस्तांतर करण्यास नकार दिला. तेव्हा मला बोलावलं होतं असे माजी आयुक्त मीरा बोरवणकर यांनी म्हटले आहे.
गृहमंत्र्यांनी निर्णय बदलला
५० एकर जागा होती हे प्रकरण नंतर हायकोर्टात गेले. शासकीय जागेवर बिल्डरची नजर असते. सुरुवात अशी झाली की, जागा हस्तांतरची प्रोसेस झाली होती, त्यानंतर मी म्हंटलं आम्हाला जागा मिळणार नाही, कॉटर्स मिळणार नाही. त्यानंतर गृहमंत्र्यांनी निर्णय बदलला. माझं आयुक्तपद दोन वर्षांचं होतं. दादा म्हटले होते की जागा द्या. लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लॉबिंग प्रत्येक खात्यात असतं.
माझं मत की जागा कुणाला देऊ नका
गृहमंत्री आर. आर. आबांनी क्लिअर सांगितलं, ‘मॅडम तुम्ही याच्यात पडू नका. मी जागा दिली असती तर ती पुणे पोलिसांच्या हिताच्या विरोधात भूमिका असती. यात क्लिअर आहे, प्रोसेस ऑफ ऑक्शन झालं आहे. बिल्डर अॅप्रोच करतो. काही जागा माझी आहे, आणि तो शासनाला विनंती करतो तुमचं पोलिस स्टेशन उचला आणि जागा मला द्या. माझं असं मत होतं की तुम्ही जागा कुणाला देऊ नका. आमची जागा आमच्याकडे राहू द्या हा एक प्रयत्न होता.
आबांबद्दल रिपीट करायला आवडणार नाही
मी जेव्हा जागा हस्तांतर करण्यास नकार दिला तेव्हा मला बोलावलं. येरवड्याची जागा ऑक्शन केली. त्याला पुणे पोलिसांनी विरोध केला. अजित पवारांनी ऑक्शन केलं नाही. अजित पवारांनी मला मिटिंगला बोलावलं आणि सांगितलं की जागा हस्तांतर करा. जागा जर बिल्डरला दिली असती तर मी चौकशीची मागणी केली असती. माझ्याआधी सत्यपाल सिंह अधिकारी होते. त्यांनी जागा का हस्तांतर केली नाही. आर आर आबांबद्दल जे काही बोलले ते रिपीट करायला मला आवडणार नाही. ते काही वाईट बोलले नाही. पण, रिपिट करायला आवडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
एक प्रकरण औरंगाबाद येथे झालं
पुण्यात अशी चर्चा झाली की या आयुक्तांना काही तरी करावं लागेल. कायदेशीर नोटीस पाठवा वगैरे. पण असं झालंय की कोणी पुस्तक वाचलं नाही. १ वर्ष आधी मी पुस्तक लिहिलं होतं. त्यानंतर दोन महिन्यापूर्वी ते प्रिंटिंगला गेलं. मला कालपासून मोठ्या प्रमाणावर पोलिसांचे फोन येत आहेत, तुमच्यामुळे आमची जागा वाचली. रिटार्यड जस्टीस बीच मल्लापल्ली यांनी मला एक पत्र पाठवलं आहे, असंच एक प्रकरण औरंगाबाद येथे झालं होते अशी माहिती मीरा बोरवणकर यांनी दिली.