वर्धापन दिनी राष्ट्रवादीचा नाविन्यपूर्ण उपक्रम; प्रत्येक घरावर फडकणार राष्ट्रवादीचा झेंडा लागणार दारावर स्टीकर

दिनांक 10 जून रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते सकाळी 10.10 वाजता झेंडावंदन होणार आहे. दरम्यान सर्व जिल्हाध्यक्षांनी जिल्हा पक्ष कार्यालयासमोर झेंडावंदन करुन कार्यकर्ता मेळावा घ्यावयाचा आहे.

वर्धापन दिनी राष्ट्रवादीचा नाविन्यपूर्ण उपक्रम; प्रत्येक घरावर फडकणार राष्ट्रवादीचा झेंडा लागणार दारावर स्टीकर
राष्ट्रवादी काँग्रेसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 4:15 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) 23 वा वर्धापन दिन दिनांक 10 जून रोजी साजरा करण्यात येत असून प्रत्येक घरावर राष्ट्रवादीचा झेंडा (NCP Flag) व दारावर स्टीकर लावण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादी वर्धापन दिन सप्ताह व 16 जूननंतर विविध प्रश्नांवर जिल्हास्तरीय आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांशी संपर्क ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धापन दिनी एक नवा कार्यक्रम पक्षाने हाती घेतला आहे असेही महेश तपासे (Chief Spokesperson Mahesh Tapase) यांनी सांगितले.

जिल्हा पक्ष कार्यालयासमोर झेंडावंदन

दिनांक 8 ते 10 जून रोजी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे मंत्री व राज्यमंत्र्यांनी घेतलेल्या समाजउपयोगी निर्णयांची माहिती द्यायची आहे. दिनांक 10 जून रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते सकाळी 10.10 वाजता झेंडावंदन होणार आहे. दरम्यान सर्व जिल्हाध्यक्षांनी जिल्हा पक्ष कार्यालयासमोर झेंडावंदन करुन कार्यकर्ता मेळावा घ्यावयाचा आहे.

विशेष कार्यक्रमाचे आयोजन

या वर्धापन दिनापासून प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा कायमस्वरूपी उभारायचा आहे. याचबरोबर घराच्या दारावर पक्षाचा स्टीकर लावायचा आहे. दिनांक 10 ते 16 जून रोजी राष्ट्रवादी वर्धापन दिन सप्ताह साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, ज्येष्ठ नागरिक सन्मान, पर्यावरणविषयक जनजागृती, पुरोगामी विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या विचारांवर आधारित व्याख्यान आयोजन, याशिवाय तालुका, जिल्हास्तरावर युवक, युवती, विद्यार्थी यांच्याकरीताही वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्हयातील महिला अध्यक्षांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करावे.

हे सुद्धा वाचा

विविध प्रश्नांसंबंधी आंदोलन

दिनांक 16 जून रोजी सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या ज्वलंत विविध प्रश्नांसंबंधी आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले आहे. या आंदोलनात महागाई, बेरोजगारी, ओबीसी आरक्षण व विरोधी पक्ष करत असलेली दिशाभूल, केंद्रसरकारमधील भाजप पक्षाच्या नेत्यांकडून महिलांचा होणारा अपमान, शेतकर्‍यांच्या समस्या आदींचा समावेश असल्याचेही महेश तपासे यांनी सांगितले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.