ShivJayanti 2022 | Varandha Ghat इथल्या कावळा दरीत शिवप्रेमींचा अपघात, तिघेही थोडक्यात बचावले
भोर येथून रायगडकडे (Raigad) शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवरून (Bike) येणाऱ्या शिवभक्तांच्या मोटरसायकलला अपघात (Accident) झाला. आज पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास वरंध घाटात कावळे किल्ल्याजवळ हा अपघात झाला.
भोर येथून रायगडकडे (Raigad) शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकलवरून (Bike) येणाऱ्या शिवभक्तांच्या मोटरसायकलला अपघात (Accident) झाला. आज पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास वरंध घाटात कावळे किल्ल्याजवळ हा अपघात झाला. मोटर सायकल सुमारे 200 फूट दरीत कोसळली. या अपघातामध्ये तीन तरूण जखमी झाले आहेत. केतन देसाई 23, प्रथमेश गरुड 25 आणि किरण सूर्यवंशी 20 (सर्व रा. भोंगवली, ता. भोर) अशी जखमींची नावं आहेत. त्यापैकी दोघांवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून एकाला प्रथमोपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. महाड औद्योगिक वसाहत पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य करीत जखमींचे प्राण वाचवले. पहाटेच हा अपघात झाला. सुदैवाने तिघेही बचावले आहेत. तर वेळेत मदत मिळाल्याने त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले. दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत.
Latest Videos