अजित दादांना मुख्यमंत्री पदापासून सातत्याने कोण डावलतंय? भाजपच्या नेत्याने घेतलेली शंका खरी?

| Updated on: Oct 27, 2022 | 7:54 PM

गेल्या काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी पवार कुटुंबात भांडण लावायचा प्रयत्न होत असल्याची प्रतिक्रिया दिली होती, त्यावरून देखील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली होती.

अजित दादांना मुख्यमंत्री पदापासून सातत्याने कोण डावलतंय? भाजपच्या नेत्याने घेतलेली शंका खरी?
Image Credit source: FACEBOOK
Follow us on

अहमदनगर : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे मध्यंतरी नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहे. रोहित पवार यांचे विधान मी ऐकले, रोहित पवार यांनी केलेले विधान आश्चर्यकारक आहे. मागेही रोहित पवार म्हणाले होते, आमच्या घरात भांडण लावण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे रोहित पवार म्हणाले ते आश्चर्यकारण आहे. अजित पवारांना कुणीतरी डावलन्याचा प्रयत्न करत आहे. अजित पवार हे मध्यंतरी नाराज असल्याचा संदर्भ लावून भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेली शंका अनेकांच्या भुवया उंचवणारी आहे. विखे पाटलांनी दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान विखे पाटील यांनी घेतलेली ही शंका भविष्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडीचा संकेत देणारी तर नाही ना ? अशीही चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हायला हवं अशी इच्छा अजित पवारांचे पूतणे रोहित पवार यांनी बारामती येथे बोलून दाखवली होती.

दिवाळीच्या निमित्ताने बोलत असतांना, रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली होती, मात्र यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी पवार कुटुंबात भांडण लावायचा प्रयत्न होत असल्याची प्रतिक्रिया दिली होती, त्यावरून देखील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली होती.

त्यातच राष्ट्रवादी हा भाजप नंतरचा मोठा पक्ष असल्याने, आणि शिवसेना फोडल्यानंतर भाजपाला टार्गेट केले जाऊ शकते अशी एक शंका रोहित पवारांनी व्यक्त केली होती.

त्यावरून रोहित पवार यांच्या अजित पवारांच्या विधानावरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अजित पवार नाराज आहे का ? पवार कुटुंबात काही कलह आहे का ? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहे.