मुक्या जीवासाठी धावलं सगळं वन विभाग; सात तासाच्या अथक प्रयत्नानंतर माकडाच्या पिल्लाची केली सुटका

मेश्वर मंदिराजवळ एका माकडाच्या पिलाचे तोंड लोट्यात (गडवा) अडकले होते. त्यानंतर मात्र त्या पिलाच्या सुटकेसाठी माकडाच्या टोळीने जीवाच्या आकांताने ती ओरडत होती. पिल्लू संकटात सापडल्यानंतर मात्र वानरसेनेने या भागात धुमाकूळ घातला होता.

मुक्या जीवासाठी धावलं सगळं वन विभाग; सात तासाच्या अथक प्रयत्नानंतर माकडाच्या पिल्लाची केली सुटका
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 3:30 PM

चंद्रपूरः एका माकडाच्या पिल्लाची (Monkey puppies) संकटातून मुक्तता करण्यासाठी वनविभागाची तीन पथके सात तास झुंजत होती. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात माकडाच्या पिलाचे तोंड लोट्यात अडकले होते. पिलाचे तोंड त्या लोट्यात अडकल्यानंतर माकड टोळीने पिलाच्या सुटकेसाठी आकांत सुरु केला होता. वनविभागाने साडे सहा तासात केवळ पिलाला ताब्यात घेऊन त्याची सुटका (Rescue the monkey cub from distress) करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. ऑपरेशन, तातडीने त्यावर उपाय करत लोटा कापून पिलाची मुक्तता करण्यात आली. वन विभागाच्या (Chandrapur Forest Department) या कामगिरीचे जिल्हाभरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

चंद्रपूरच्या राजुरा शहरातील सोमनाथपूर वार्ड भागात विचित्र संकटात एक माकडाचे पिल्लू सापडले होते. त्या माकडाच्या पिल्लाच्या सुटकेसाठी वनविभागाच्या 3 विशेष पथकांनी प्रयत्नांची शर्थ केली होती.

माकडाच्या पिलाचे तोंड लोट्यात

सोमेश्वर मंदिराजवळ एका माकडाच्या पिलाचे तोंड लोट्यात (गडवा) अडकले होते. त्यानंतर मात्र त्या पिलाच्या सुटकेसाठी माकडाच्या टोळीने जीवाच्या आकांताने ती ओरडत होती. पिल्लू संकटात सापडल्यानंतर मात्र वानरसेनेने या भागात धुमाकूळ घातला होता.

बचाव पथकाला पाचारण

वनविभागाला या घटनेची माहिती मिळताच वनपथक घटनास्थळी दाखल झाले. माकडाच्या पिलाला ताब्यात घेण्याकरीता पिंजरा, जाळी, तसेच खाद्य वापरुन प्रयत्न करण्यात आले परंतु माकडाची टोळी या गोष्टींना दाद देत नव्हती. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बचाव पथक तसेच कोठारी येथील बचाव पथकाला पाचारण करून ही मदतीची योजना आखण्यात आली.

अथक परिश्रमानंतर पिलाला ताब्यात

तब्बल साडेसहा तासाच्या अथक परिश्रमानंतर पिलाला ताब्यात घेतले गेले. पिलाच्या चेहऱ्यावर अडकलेला लोटा कापून काढण्यात आला.

उपचार करून निसर्गमुक्त

माकडाच्या पिल्ल्याची प्राथमिक आरोग्य तपासणी व उपचार करून सुदृढ असल्याची खात्री केली व त्याच्या आईसोबत निसर्गमुक्त करण्यात आले. वन विभागाच्या या कामगिरीचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.