Nanded : विहिरीत पडलेलं हरणाचं पिल्लू गारठलं, वनविभागाने केलेल्या कामगिरीमुळे ग्रामस्थ खूश
अनेकदा पाण्याच्या ठिकाणी किंवा अंदाज न आल्याने प्राणी पाण्यात पडतात. त्याचबरोबर पाण्यात अडकून राहतात.काल झालेल्या घटनेत हरण पडल्याच पाहताचं नागरिकांनी तत्परता दाखवली.
नांदेड : नांदेडच्या (Nanded) दुर्गम भागातील इस्लापुर वनक्षेत्रात (Islampur Forest Area) हरणाचे एक पिल्लू एका शेतकऱ्यांच्या (Farmer) विहिरीत पडले होते. यावेळी शेतकऱ्यांनी माहिती देताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीत उतरून हरणाच्या पिल्लाला सुरक्षितरीत्या बाहेर काढले. विहिरीच्या बाहेर काढताच या हरणाच्या पिल्लाने धूम ठोकलीय. वनविभागाच्या या तत्परतेने हरणाच्या पिल्लाला जीवदान मिळाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
हे सुद्धा वाचा
अनेकदा पाण्याच्या ठिकाणी किंवा अंदाज न आल्याने प्राणी पाण्यात पडतात. त्याचबरोबर पाण्यात अडकून राहतात.काल झालेल्या घटनेत हरण पडल्याच पाहताचं नागरिकांनी तत्परता दाखवली. वनविभागातील अधिकारी तिथं आले आणि हरणाची त्यांनी सुटका केली. त्यामुळे त्यांचं गावकऱ्यांनी कौतुक केलं.