VIDEO : हातनूर धरणाच्या प्रकाशा बॅरेजचे दरवाजे बंद, आता तापी नदीपात्रात मासेमारीसाठी मोठी गर्दी
आता प्रकाशा बॅरेजचे दरवाजे बंद करण्यात आल्याने नदीतील पाणी पातळी कमी झालीय. त्यामुळे तापी नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. प्रकाशा बॅरेजजवळील तापी नदीच्या पात्रात हे सर्व चित्र दिसून येत आहे.
नंदुरबार :- गेल्या आठवड्यात मध्य प्रदेश आणि जळगावमध्ये दमदार पाऊस झाल्याने हातनूर धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी तापी नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पण पावसानं काहीशी उसंत घेतल्यानंतर सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला होता.
तापी नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी
आता प्रकाशा बॅरेजचे दरवाजे बंद करण्यात आल्याने नदीतील पाणी पातळी कमी झालीय. त्यामुळे तापी नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. प्रकाशा बॅरेजजवळील तापी नदीच्या पात्रात हे सर्व चित्र दिसून येत आहे. रोजगार नसल्याने स्थानिक तरुण मासेमारीकडे वळल्याचे सध्या तरी जिल्ह्यात दिसून येत आहे. मासेमारीतून थोड्या फार प्रमाणात रोजगार प्राप्त होत असल्याने तरुणांनी नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गर्दी केलीय.
हतनूर सिंचन प्रकल्पासारखे धरण 20 वेळा भरेल, एवढं पाणी वाया
दुसरीकडे तापी नदीचे पाणी अडविण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी ठरत आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात तापी नदीचे सुमारे 200 ते 300 टीएमसी पाणी गुजरात राज्याच्या दिशेने वाहून जाते. तापीच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचा विचार केला, तर जळगाव जिल्ह्यातील हतनूर सिंचन प्रकल्पासारखे धरण 20 वेळा भरेल, एवढे पाणी दरवर्षी डोळ्यादेखत वाहून जात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आतातरी सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यासाठी पाऊले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.
कुठून उगम पावते तापी नदी?
मध्य प्रदेशातील बैतूल प्रांतातून उगम पावणारी सूर्यकन्या तापी नदी ही खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी गंगा समजली जाते. तापीचा उगम मध्य प्रदेशातून झाला असला तरी तिचा सर्वाधिक फायदा हा महाराष्ट्राला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मध्य प्रदेश, विदर्भासह पूर्णा नदीच्या पुरामुळे तापी नदी दुथडी भरून वाहते. परंतु तापी नदीवर मोठे सिंचन प्रकल्प नसल्याने हे पाणी गुजरातच्या दिशेने वाहून जाते. पुढे ते उकई सिंचन प्रकल्पातून थेट समुद्रात जाऊन मिळते. वर्षानुवर्षे हे चक्र सुरू आहे. सिंचन प्रकल्प नसल्याने खान्देश आजही तहानलेलाच आहे. शेती सिंचनाचा प्रश्नही बिकट आहे. संबंधित बातम्या
शेतकऱ्यांची चिंता मिटली, पुण्यातील चासकमान धरण 100 टक्के भरले
डॅम इट! भुशी डॅम परिसरात नाकाबंदी, पोलिसांची नजर चुकवत पर्यटकांची धबधब्यांवर गर्दी