‘The End’ चा बोर्ड कधीही…, शिंदे गटाच्या नेत्याने उद्धव ठाकरे गटाला सुनावले

ज्या आमदारांनी अजित पवार मुख्यमंत्री असे ट्विट केले ते स्वप्न पाहत आहेत. याला गांभीर्याने घेऊ नये. आम्हीच तुमचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. आमचा कार्यक्रम कुणी करू शकत नाही. अजित पवार आले म्हणून आमची चिंता वाढली नाही. आमची कोंडी झाली नाही.

'The End' चा बोर्ड कधीही..., शिंदे गटाच्या नेत्याने उद्धव ठाकरे गटाला सुनावले
SANJAY RAUT AND UDDHAV
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 2:34 PM

औरंगाबाद : उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत दररोज सकाळी माध्यमांशी बोलत असतात. त्यावेळी ते करत असलेल्या आरोपांना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रत्युत्तर देत पलटवार करतात. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानासमोर भावी मुख्यमंत्री म्हणू बॅनर्स झळकले आहेत. तर काही आमदारांनीही स्वतःच्या ट्विटर हॅन्डलवर भावी मुख्यमंत्री असे ट्विट केले आहे. त्यावरून संजय राऊत फडणवीस आणि अजित दादा शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम करतील. ही जी दोस्ती आहे ते दोघे मिळून शिंदे गटाचा कार्यक्रम करतील. हे सगळं ठरल्याप्रमाणे स्क्रिप्टप्रमाणे होईल असा टोला लगावला. त्याला शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय.

कुणाची स्क्रिप्ट असो किंवा नसो. पण पुढे काय होणार याची जाणीव आम्हाला आहे. दुसऱ्याकडे धनकुन पाहण्याऐवजी आपण आपल्या स्क्रिप्टची चर्चा करा. तुमच्या पक्षाला ‘The End’ चा बोर्ड कधीही लागू शकतो याची आधी काळजी घ्या, असा इशाराही त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

त्या अधिकाऱ्यावर ED ची कारवाई सुरू

शेतकरी आत्महत्या करत असल्याचा अहवाल अत्यंत चुकीचा आहे. विभागीय आयुक्त यांनी चुकीचा अहवाल दिल्याने संताप आला असेल. शेतकऱ्यांना आत्महत्या \करायला प्रवृत्त करणारा अहवाल असेल तर निश्चित कारवाई करू. जर हा अहवाल चुकीचा असेल तर त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, कृषी आत्महत्याप्रकरणी अहवाल दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर ED ची कारवाई सुरू आहे, असेही ते म्हणाले.

दोन मुंढे एकत्रित आले

देशाच्या इतिहासात तीन महिन्यात तीन वेळा एका अधिकाऱ्यांची बदली झाली. तुकाराम मुंढे यांची पुन्हा कृषी खात्याचे सचिव म्हणून बदली झाली. आता दोन्ही मुंढे एकत्रित आल्याने कृषी खात्याचा विकास त्यांच्यावर अवलंबून आहे. भविष्यात शेतकरी हतबल होणार नाही यासाठी त्यांना मदत करावी लागणार आहे. सर्व मुंडे मुंडे यांच्यामध्ये भांडण आहे असे काही नाही. काही मुंढे भांडण न करताही एकत्र चांगले राहू शकतात असे शिरसाट यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.