Chandrapur : पहले आप! वाघासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी महामार्गावरील वाहतूक थांबवली; चंद्रपुरातील घटनेची होतेय चर्चा

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघोबाला वाट मोकळी करुन दिल्यानंतर रस्ता ओलांडताना वाघाचा काय रुबाब होता ? त्याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वाहनधारकांना देखील अगदी जवळून वाघाचे चित्रण करण्याची संधी मिळाली होती. वन विभागाचे अधिकारी तेथेच असल्याने प्रवाशांचे धाडस वाढले होते.

Chandrapur : पहले आप! वाघासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी महामार्गावरील वाहतूक थांबवली; चंद्रपुरातील घटनेची होतेय चर्चा
नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावर वनविभागाने वाहतूक थांबवून वाघोबाला जाण्यासाठी मार्ग मोकळा करुन दिलाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 11:30 AM

चंद्रपूर : (Tiger) वाघाचा दरारा केवळ जंगलातच नाही तर भर रस्त्यावरही कसा आहे याचा प्रत्यय नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावरील (Travels) प्रवाशांना चांगलाच अनुभवता आला. वन्यप्राणी आता मानववस्तीकडे मार्गस्त होतात यामध्ये काही नवखे राहिलेले नाही. शिवाय जंगली भाग असलेल्या परिसरात तर या घटना अधिकच घडतात. असाच प्रकार नागडभी-ब्रम्हपुरी या महामार्गावरील सायगाटा येथे घडला आहे.  वाघ हा रस्ता ओलांडत होता तर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा होत्या. पहले आप..! असे म्हणत (Forest department officials) वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघोबाला मार्ग मोकळा ठेवला. प्रवाशांसाठी देखील नवखा अनुभव होता पण तिथे वन अधिकरी असल्याने प्रत्येकाला वाघोबाचे दर्शन झाले. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा आणि मोठ्या डौलात त्यांने रस्ता ओलांडला.

नेमकी घटना काय आहे?

चंद्रपूर जिल्ह्यातील जंगली भागात वाघांचा सातत्याने वावर असतो. नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावरील सायगाटा येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या त्या घटनेची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्याचे झाले असे नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावरुन वाहनांची मोठी वर्दळ सुरु होती. त्यामुळे रस्त्याच्याकडेला असलेल्या वाघाला रस्ता ओलांडणे शक्य नव्हते. बराच वेळ गेला तरी रस्ता काही मोकळा होत नव्हता. ही बाब वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी लागलीच दोन्ही बाजूंची वाहतूक काही वेळेसाठी थांबवली आणि वाघाला मार्ग मोकळा करुन दिला.

वाघाचा रुबाब कायम..

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघोबाला वाट मोकळी करुन दिल्यानंतर रस्ता ओलांडताना वाघाचा काय रुबाब होता ? त्याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वाहनधारकांना देखील अगदी जवळून वाघाचे चित्रण करण्याची संधी मिळाली होती. वन विभागाचे अधिकारी तेथेच असल्याने प्रवाशांचे धाडस वाढले होते. पण तो काही सेकंदाचा कालावधी सर्वच प्रवाशांसाठी वेगळाच अनुभव देणारा ठरला आहे.

हे सुद्धा वाचा

प्रवाशांनी केले घटनेचे चित्रिकरण

इतरवेळी जंगलात वाघाचे दर्शन होतेच असे नाही. मात्र, या महामार्गावर घडलेले प्रसंग प्रवाशांसाठी वेगळाच ठरला आहे. भररस्त्यावरुन वाघ मार्गस्थ होत असताना अनेक प्रवाशांनी या घटनेचे चित्रिकरण मोबाईमध्ये करुन घेतले आहे. प्रवाशांना आधार होता तो वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा त्यामुळेच हे शक्य झाले. वाघोबाचेहीम मार्गक्रमण झाले आणि प्रवशांनाही वाघोबाचे दर्शन मिळाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.