‘रेमडेसिव्हीर’ पाठोपाठ वर्ध्यात ‘एम्फेटेरेसिन बी’ इंजेक्शनचीही निर्मिती, म्युकरमायकोसिस रुग्णांना दिलासा मिळणार
वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेसमध्ये आता एम्फेटेरेसिन बी हे इंजेक्शनही तयार केलं जाणार आहे.
वर्धा : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या जेनेटिक लाईफ सायन्सेसमध्ये आता एम्फेटेरेसिन बी हे इंजेक्शनही तयार केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारने वर्ध्यातील कंपनीला ही परवानगी दिली आहे. तशी माहिती कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे. येत्या 15 दिवसात हे इंजेक्शन बनवण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. (amphotericin B injection will develop in Wardha)
कोरोना रुग्णांना म्युकरमायकोसिस हा जिवघेणा आजार होत असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या 1 हजार 500 च्या आसपास पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यावेळी म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या दिल्या जाणाऱ्या एम्फेटेरेसिन बी इंजेक्शनबाबत टोपे यांनी केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेसमध्ये या इंजेक्शनची निर्मिती होणार असल्याने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एम्फेटेरेसिन बी इंजेक्शनची किंमत कमी होणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कंपनीला इंजेक्शन उत्पादन निर्मितीबाबत विचारणा केली होती. एम्फेटेरेसिन बी या इंजेक्शनची किंमत सर्वसामान्य रुग्णाला परवडणारी नाही. मात्र, वर्ध्यातील कंपनीत एम्फेटेरेसिन बी या इंजेक्शनची निर्मिती झाल्यास त्याची किंमत 1 हजार 200 ते 1 हजार 400 रुपये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णाला त्याचा लाभ होऊ शकतो. या कंपनीत 20 हजार इंजेक्शन तयार होणार असल्याची माहिती डॉक्टर क्षीरसागर यांनी दिली आहे.
राजेश टोपेंच्या केंद्राकडे महत्वाच्या मागण्या
महाराष्ट्रातील म्युकरमायकोसिस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा कोटा वाढवून द्यावा. तसंच या इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात यावेत. एम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची किंमत 6 हजाराच्या आसपास आहे. एका रुग्णाला 20 – 20 इंजेक्शन्स द्यावी लागत आहेत. अशावेळी इंजेक्शन्सची किंमत कमी करावी अशी आग्रही मागणी टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली असल्याचं सांगितलं होतं. त्याचबरोबर म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराबाबत जनजागृतीची गरज असल्याचं टोपे म्हणाले. काळ्या बुरशीवर प्रतिबंधात्मक उपाय करायला हवे, त्यासाठी जनजागृती होणं गरजेचं असल्याचं टोपे म्हणाले.
‘म्युकरमायकोसिस’बाबत राज्य सरकारची मोठी घोषणा
आजाराबाबत ठाकरे सरकारनं मोठी घोषणा केली आहे. म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आला आहे. तशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली 4 दिवसांपूर्वी दिली होती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस हा बुरशीजन्य आजार बळावत असल्याचं पाहायला मिळत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास माणूस दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर योग्य वेळी आणि योग्य उपचार घेणे महत्वाचे आहे.
कोरोना महामारीत लस उत्पादन करणारी कंपनी मालामाल, सीरमचा नफा तब्बल…………https://t.co/XSJzecYP94#SerumInstitute #SerumInstituteofIndia #AdarPoonawala #CoronaVaccine #SerumInstituteIncome #AdarPoonawalaIncome
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2021
संबंधित बातम्या :
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचा झपाट्याने संसर्ग, नव्या संकटाची चाहुल?
‘म्युकरमायकोसिस’बाबत फक्त घोषणा, अजून किती बळी घेणार आहात? राजू शेट्टींचा सवाल
amphotericin B injection will develop in Wardha