चित्रपटाला साजेशी घटना! पांढऱ्या गाडीतून अपहरण, वडिलांना फोन लावून पैशाची मागणी, नंतर जे काही समोर आलं ते धक्कादायकच आहे
चित्रपटाला साजेशी घटना नाशिकच्या सिन्नर शहरात घडली असून नाशिकच्या ग्रामीण पोलिसांचे कौतुक होत आहे. अपहरणाची घटना ठरतेय चर्चेचा विषय.
नाशिक : नाशिकच्या सिन्नर शहरात चित्रपटाला साजेशी घटना घडली आहे. एका व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण सायंकाळी झाले होते. नंबर नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या ओमणी कारमधून मुलाचे तिघांनी अपहरण केले होते. पोलीस ठाण्याच्या समोरील रस्त्यावरून जात त्यांनी मुलाच्या वडिलांना फोन करून पैशाची मागणी केली होती. दहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करून अपहरण कर्त्यांनी गुरेवाडी येथून कॉल केल्याने पोलिसांना तिथपर्यंत मोबाईल लोकेशन मिळाले होते, त्यानंतर अपहरण कर्त्यांनी मोबाइल स्विचऑफ केल्याने पोलिसांसमोरील अडचणी वाढल्या होत्या. सिन्नर मधील चिराग तुषार कलंत्री या दहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. त्याच्या अपहरणाची माहिती समजताच संपूर्ण कुटुंब हादरले होते. चिराग तुषार कलंत्री याच्या अपहरणाची माहिती पोलिसांना लागलीच देण्यात आली होती. त्यामध्ये नाशिकचे पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी याबाबत लागलीच संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली होती. त्यामध्ये अपहरण कर्त्यांना पळून जाण्यात यश न आल्याने काही तासातच अपहरण कर्त्यांनी मुलाला त्याच्या घराजवळ सोडून पळ काढला आहे.
सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान चिराग तुषार कलंत्री हा मुलगा खेळत असतांना त्याचे अपहरण करण्यात आले होते, त्यामध्ये ओमणी गाडीतून त्याला घेऊन गेल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे होते.
काही वेळातच ही बाब घरात सुरू असतांना चिराग तुषार कलंत्री यांना अपहरण केल्याचा फोन आला, त्यामध्ये धमकी देत पैशाची मागणी करण्यात आली होती.
कलंत्री यांनी तात्काळ पोलिसांना ही बाब कळवली, परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले त्यामध्ये ओमणी गाडी भरधाव वेगाने जात असल्याचे समोर आले.
पोलीसांनी संपूर्ण जिल्ह्यात लागलीच नाकाबंदी केली, त्यामुळे अपहरण कर्त्यांना काही मिनिटांतच नाकाबंदी केल्यामुळे पळून जाणे अशक्य झाले, त्यामुळे काही तासामध्ये मध्यरात्रीच्या वेळी मुलाला घराजवळ सोडून पुन्हा पळून केले आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधिक्षक शहाजी उमाप आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी लागलीच नाकाबंदी करून पोलीसिंग सुरू केल्याने अपहरणा प्लॅन फसला गेला आहे.
यामध्ये हे अपहरण कुणी केले? कुणाचा सहभाग होता, कलंत्री कुटुंबाकडून कुणाला पैसे उकळायचे होते याचा शोध नाशिकच्या ग्रामीण पोलिसांना घ्यावा लागणार आहे.