Nandurbar : शिकारीच्या शोधात असलेला बिबट्याचा डाव पाय सापळ्यात अडकला, मग वनविभागाने..
मादी बिबट्याचा पुढील डावा पाय या सापळ्यात फसल्याने त्याने स्वतःची सुटका करून घेतली. तब्बल सहा तासानंतर वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या मादी बिबट्याला बेशुद्ध न करता पिंजऱ्यात कैद केलं.
नंदुरबार : जिल्ह्यात (Nandurbar) अक्कलकुवा जवळ शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याचा (leopard) डावा पाय अडकला. त्यानंतर बिबट्याने ओरडून संपुर्ण गावाला जागं केलं. बिबट्याची तळमळ अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केली आहे. बिबट्या अडकल्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बिबट्याची तिथून सुटका केली. त्यानंतर गावकऱ्यांनी वनविभागाच्या (forest department) अधिकाऱ्यांचं कौतुक केलं. बिबट्याला जंगलात सोडण्याची ग्रामस्थांची मागणी वनविभागाने मान्य केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडाच्या डोंगररांगांखाली असलेल्या अक्कलकुवा जवळ एका सापळ्यात अडकलेल्या बिबट्याला सुखरूप सोडवण्यात वनविभागाला यश मिळाले आहे. पिकांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांपासून बचावासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर सापळा लावला होता. या सापळ्यात शिकारीचा शोधात असलेला बिबट्या अडकला होता.
मादी बिबट्याचा पुढील डावा पाय या सापळ्यात फसल्याने त्याने स्वतःची सुटका करून घेतली. तब्बल सहा तासानंतर वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या मादी बिबट्याला बेशुद्ध न करता पिंजऱ्यात कैद केलं. सध्या या मादी बिबट्याची प्रकृती स्थिर असून, त्याला लवकरच सुरक्षित वनपरिक्षेत्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी सापळे लावू नयेत असं आवाहनही वन विभागाकडून करण्यात आला आहे.