Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरुणाची ट्रेनमधून चोरीला गेलेली बॅग एसटीमध्ये सापडली, प्रामाणिक एसटी कर्मचाऱ्यांमुळे शैक्षणिक कागदपत्रे परत मिळाली

एसटीच्या प्रवासात ड्रायव्हर आणि कंडक्टरांनी वेगवेगळे अनुभव येत असतात. इगतपूरी ते धुळे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना एक आगळाच अनुभव आला आहे.

तरुणाची ट्रेनमधून चोरीला गेलेली बॅग एसटीमध्ये सापडली, प्रामाणिक एसटी कर्मचाऱ्यांमुळे शैक्षणिक कागदपत्रे परत मिळाली
msrtcImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 9:47 PM

मुंबई | 3 ऑगस्ट 2023 : एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे एका तरुणाची हरवलेली बॅग त्याला सहिसलामत परत मिळाली आहे. इगतपूरी ते कसारा ही एसटी कसारा येथे पोहचली असताना पाऊस जादा असल्याने कंडक्टर गोरख.एच. शिंदे यांनी खिडक्या बंद करीत होते. त्यावेळी त्यांना एक बॅग सापडली. शिंदे यांनी ड्रायव्हर पी.आर.खाडे यांना या बॅगेबद्दस सांगितले. त्यानंतर सूत्रे फिरवून ही बॅग तिच्या मालकापर्यंत सहीसलामत पोहचली. बॅगेत 14 हजार रुपयांची रोख रक्कम आणि दहावी पासूनची शैक्षणिक प्रमाणपत्रे होती.

एसटीच्या प्रवासात ड्रायव्हर आणि कंडक्टरांनी वेगवेगळे अनुभव येत असतात. इगतपूरी ते धुळे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना एक आगळाच अनुभव आला, दुपारी 12.45 वाजता इगतपुरी-कसारा कामगिरी संपवून कर्मचारी कसारा ते धुळे प्रवासाला निघणार होते. कसारा येथे पोहचल्यावर सर्व प्रवासी उतरल्याने पावसामुळे खिडक्या बंद करताना एक बॅग शिंदे यांना सापडली. या बॅगेत राजरत्न प्रभाकर कोकाटे या तरुणाची शैक्षणिक प्रमाणपत्रे सापडली. त्यांचे गाव एकलहारा ( ता. संग्रामपूर जि. बुलढाणा ) असा पत्ता आढळला. त्याच्यावर असलेले फोन नंबर बंद लागले. नंतर त्याच्या भावाचा नंबर मिळाला. त्यावर कॉल करुन बॅग सापडल्याची माहीती कर्मचाऱ्यांनी दिली.

फोन लागल्यावर त्या मुलाने सांगितलेली कहाणी धक्कादायक होती. त्याची बॅग नाशिक ते इगतपुरीच्या दरम्यान ट्रेनमधून कोणीतरी चोरली होती. तशी तक्रार त्याने रेल्वे पोलीस ठाण्यात केली होती. मग त्याला त्यांनी बॅग सापडल्याचे कळविले. त्या बॅगमध्ये आतल्या कप्प्यात 14000 हजार रुपये होते, व त्याचे इयत्ता 10 वी पासून ते ग्रॅज्युएट पर्यंतचे सर्व ओरिजनल कागदत्रे होती, हे सर्व ऐकल्यावर त्या मुलाने बॅग घेण्यासाठी थेट धुळे गाठले.

इस्रोच्या नोकरीसाठी मुंबईला चालला होता

राजरत्न सध्या जिल्हा परिषद हिंगोली येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्याने त्याची निवड इस्रोमध्ये झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्या नोकरीच्या निमित्ताने कागदपत्रे छाननीसाठी तो मुबंईला निघाला होता. ज्या चोराने ही बॅग चोरली त्याने वरच्या कप्प्यातील 1700 रुपये काढून घेतले आणि ती बॅग बसमध्ये सोडून गेला होता. जर बॅग सापडली नसती तर आपण जीवाचे काही तरी बरेवाईट करुन घेतले असते असे राजरत्न याने सांगितले.

कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.