Vinayak Mete : मेटेंच्या अपघाताचे रहस्य उलगडणार, चौकशीसाठी गाडीचा ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात..!

चालक एकनाथ कदम यांने दिलेल्या माहितीनुसार खोपोलीजवळ गाडी आली असता एका ट्रकने मेटेंच्या गाडीला कट मारला. यामुळे चालक कदम याचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यामुळे समोरील अज्ञात वाहनाला जोराची धडक बसली होती. मात्र, ही धडक एवढी भयानक होती की गाडीची डावी बाजू चक्काचूर झाला आहे. शिवाय मेटे देखील डाव्या बाजूलाच बसले होते.

Vinayak Mete : मेटेंच्या अपघाताचे रहस्य उलगडणार, चौकशीसाठी गाडीचा ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात..!
विनायक मेटे यांच्या कार ड्रायव्हरची होणार चौकशी
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 5:56 PM

मुंबई :  (Vinayak Mete) विनायक मेटे यांच्या अपघातानंतर आता एक ना अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे या (Accident) अपघाताची चौकशी करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून तर करण्यात आली आहेच पण नेमका अपघात कसा झाला, त्यावेळी नेमके काय झाले होते याची चौकशी करण्यासाठी विनायक मेटे यांच्या (Driver) ड्रायव्हरला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विनायक मेटे, अंगरक्षक आणि ड्रायव्हर एकनाथ कदम हे तिघेच बीडहून मुंबईकडे निघाले होते. दरम्यान, पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. यामध्ये विनायक मेटे यांचे निधन झाले असून आता चौकशीच्या आदेशानंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

ड्रायव्हरने नेमके काय सांगितले?

चालक एकनाथ कदम यांने दिलेल्या माहितीनुसार खोपोलीजवळ गाडी आली असता एका ट्रकने मेटेंच्या गाडीला कट मारला. यामुळे चालक कदम याचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यामुळे समोरील अज्ञात वाहनाला जोराची धडक बसली होती. मात्र, ही धडक एवढी भयानक होती की गाडीची डावी बाजू चक्काचूर झाला आहे. शिवाय मेटे देखील डाव्या बाजूलाच बसले होते. त्यानंतर कदम यांनी मेटेंच्या कुटुंबियांना तसेच इतरांना फोन करुन घटेनची माहिती सांगितली व मदतीसाठी कुणाला तरी पाठवा अशी विनंतही केली. मात्र, एक तास उलटल्यानंतरही त्यांना मदत मिळाली नाही.

अपघातानंतरही मेटे ड्रायव्हरला बोलले

अपघात होताच विनायक मेटेंशी संवाद करण्याचा प्रयत्न एकनाथ कदम यांनी केला होता. त्या दरम्यान ते आपल्याला बोलले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उपचारासाठी 100 नंबरवर संपर्क साधला पण त्यांनी फोन उचलला नाही. एवढेच नाही तर मदतीसाठी प्रत्येक वाहनधारकाला विनंती केली पण कणीच थांबले नाही असेही कदम यांनी सांगितले आहे. एका तासानंतर रुग्णवाहिका आल्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल केल्याचे ड्रायव्हरने सांगितले आहे. मात्र, एक तास मिळालेली रुग्णसेविका आणि मुंबईतील बैठकीच्या वेळेत झालेला बदल यावरुन आता तर्क-वितर्क लावले जात आहेत.

तीन वर्षापासून कदमच ड्रायव्हर

गेल्या तीन वर्षापासून एकनाथ कदम हेच विनायक मेटे यांच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत. एवढेच नाहीतर ते मेटेंच्या घरच्यांनाही गाडीद्वारे सोडत होते. कदम हे मुळचे बीड जिल्ह्यातील असून त्यांच्याबद्दल आपल्या मनात काही नसल्याचे मेटेंच्या कुटुंबातील सदस्याने यापूर्वीच सांगितले होते. मात्र, आता त्यांनी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शिवाय त्यांची आरोग्य तपासणीही केली जाणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.