Bhandara : वाघाच्या मृत्यूचं गूढ उककलं; स्थानिक शिकाऱ्यांनीच मारल्याचं उघड
भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तुमसर (Tumsar) तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात झालेल्या वाघाच्या (Tiger) मृत्यूचे गूढ उघडले असून स्थानिक शिकाऱ्यांनी वाघाला मारले असल्याचं उघड झालं आहे. ह्यात शिकारी व 4 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तुमसर (Tumsar) तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात झालेल्या वाघाच्या (Tiger) मृत्यूचे गूढ उघडले असून स्थानिक शिकाऱ्यांनी वाघाला मारले असल्याचं उघड झालं आहे. ह्यात शिकारी व 4 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान शिकारीचे साहित्य, बैलगाडी, इतर जनावराचे हाड त्याच्या घरून जप्त करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्याच्या नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या बपेरा या गावा लगत बावनथडी प्रकल्पाच्या छोट्या कालव्यामध्ये गुरुवारी सायंकाळी एक नर वाघ मृतावस्थेत आढळला होता. स्थानिक गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिली असता माहिती मिळताच क्षेत्रीय वनकर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाल. मृत वाघाचे शव वनकर्मचाऱ्यांनी कालव्याबाहेर काढले शव विच्छेदन केले. दरम्यान वाघाचे नख, एक दात आणि एक पाय तुटला असल्याचे निदर्शनास आले. वाघाची शिकार सिद्ध होताच भंडारा पोलीस विभागाच्या डॉग स्क्वाडला पाचारण करत तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळालगत असलेल्या जमीन मालकाला शेतकर्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता वाघाची शिकार केल्याचे त्याने कबुल केले असून त्याच्याकड़ून शिकारीचे साहित्य, बैलगाडी, इतर जनावराचे हाड त्याच्या जप्त करण्यात आले आहे. वन विभागाद्वारे पुढील तपास सुरू आहे.
Latest Videos