महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा आताताईपणा उघड, वाद उभा राहण्याची शक्यता…

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन मोठं राजकारण रंगलेलं पाहायला मिळालेलं आहे. त्यातच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर शहराचे नाव बदलले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा आताताईपणा उघड, वाद उभा राहण्याची शक्यता...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 11:44 AM

दत्ता कानवटे, औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन पुन्हा एकदा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा आताताईपणा समोर आला आहे. शिवशाही बसच्या डिजिटल बोर्डवर औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजी नगरचा उल्लेख करण्यात आला आहे. शहराच्या नावात बदल होण्याआधीच महामंडळाने शहराचं नाव बदललं आहे. शिवशाहीच्या डिजिटल बोर्डवर रंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगरचे बोर्ड झळकले आहे. दरम्यान, शिवशाही बसेसच्या डिजिटल बोर्ड मध्ये बदल करण्यात आला आहे. खरंतर मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराच्या नामांतरावर निर्णय झाला असला तरी त्यावरून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आक्षेप घेतलेला असल्याने त्यावर वाद कायम आहे. राजकीय नेत्यांमध्ये त्यावरून आजही आरोप प्रत्यारोप केले जात आहे. त्यातच आता राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसेसच्या बोर्डवर छत्रपती संभाजीनगर नावं झळकले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन मोठं राजकारण रंगलेलं पाहायला मिळालेलं आहे. त्यातच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर शहराचे नाव बदलले आहे.

औरंगाबाद शहराचे नामांतर अजून पूर्ण झालेले नाही, त्यावर आजही विरोध केला जातो आहे. औरंगाबाद हेच नावं असू द्यावे असा एक गट आहे तर दूसरा गट छत्रपती संभाजीनगर असे नाव नामांतर करावे अशी मागणी करत आहे.

हे सुद्धा वाचा

औरंगाबाद शहरात येणाऱ्या शिवशाही बसच्या डिजिटल बोर्डवर छत्रपती संभाजीनगर असा आशयाचा बोर्ड झळकला आहे. त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले असून एसटी महामंडळाच्या आताताईपणावर टीका टिपणी होऊ लागली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी येत्या काळात डिजिटल बोर्डवरील मजकूर बदलला जाण्याची शक्यता आहे, अन्यथा त्यावरून कारवाईची मागणी देखील पुढे येऊ शकते, त्यामुळे शिवशाहीवरील डिजिटल बोर्ड चर्चेचा विषय ठरत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.