कार्यक्रम ठाकरे गटाच्या नगरसेविकेचा…उद्घाटनाला मात्र शिंदे गटाचे खासदार, राजकीय चर्चेला उधाण

हर्षदा गायकर यांनी याबाबत सोशल मीडियावर याबाबतचे पोस्टर्स शेयर केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

कार्यक्रम ठाकरे गटाच्या नगरसेविकेचा...उद्घाटनाला मात्र शिंदे गटाचे खासदार, राजकीय चर्चेला उधाण
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 1:07 PM

नाशिक : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर राज्यभर ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा सामाना निर्माण झाला आहे. जहरी टीका ठिकठिकाणी केली जात असून मोठा संघर्ष बघायला मिळत आहे. मात्र, यामध्ये नगरसेवकांची गोची होत असल्याची भावना एका नाशिकमधील नगरसेविकेने बोलून दाखवली आहे. नाशिकमधील नगरसेविकेने लावलेला उद्घाटनाचा फलक नाशिकच नाही संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. नाशिकच्या नवीन नवीन नाशिक विभागातील ठाकरे गटाच्या नगरसेविका हर्षदा गायकर यांनी त्यांच्या उद्घाटन कार्यक्रमाला शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना निमंत्रित केले आहे. आज या उद्घाटन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण राज्यभर चर्चा होत आहे. राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होत असली तरी याप्रकरणी ठाकरे गटाच्या नगरसेविका हर्षदा गायकर यांनी याबाबत सडेतोड भूमिका मांडली आहे.

ठाकरे गटाच्या नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या प्रभागात खासदार हेमंत गोडसे यांनी दिलेल्या निधीतून विकासकामे होत आहे.

त्याच विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या नगरसेविका हर्षदा गायकर यांनी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना निमंत्रित केले आहे.

हे सुद्धा वाचा

हर्षदा गायकर यांनी याबाबत सोशल मीडियावर याबाबतचे पोस्टर्स शेयर केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

यादरम्यान हर्षदा गायकर यांनी शिंदे गटात जाणार नसल्याचे स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांच्याच पक्षात राहणार असून मशाल चिन्हावर निवडणूक लढवू असं देखील गायकर यांनी म्हंटले आहे.

शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे आमच्या सारख्या नगरसेवकांची अडचण होत असल्याचे देखील गायकर यांनी सांगत नगरसेवकांची गोची कशी होते याबाबत खुलासा केला आहे.

गायकर यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवर उलटसुलट चर्चा सुरू झाली असून वरिष्ठ नेत्यांचे या कार्यक्रमाकडे लक्ष लागून आहे.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.