पंढरपूरात भंगारवाल्याची चोरी 69 बालकांचा जीवावर; रुग्णालयाने पर्यायी व्यवस्था केल्याने बालकांवरील धोका टळला
दरम्यान बॅटरी काढल्याने अतिदक्षता विभागात असलेल्या 69 बालकांचा जीवाला धोका निर्माण झाला होता. पण डॉ. शितल शहा यांनी प्रसंगावधान राखत पर्यायी व्यवस्था केली. यामुळे त्या वॉर्डातील बालकांच्या जीवावरील धोका टळला.
पंढरपूर : चोर चोरी करण्यासाठी कोणत्या खराला जातील याचे काही सांगता येत नाही. तर चोरी करणारा हा आपल्या काय तर दुसऱ्याच्याही जीवाची पर्वा करत नाही. त्यामुळेच अनेक वेळा एकतर चोरी करणाऱ्याचा अंत होतो किंवा चोरीला विरोध करणाऱ्याचा. तर पंढरपूर मात्र एका घटनेने पुरते हादरले. तर काही क्षणानंतर जीवात जीव असल्यागत ही पंढरपूरकरांना वाटले. येथे एका भंगारवाल्याची चोरी 69 नवजात बालकांचा जीवावर बेतली असती. मात्र वेळ न घालवता रुग्णालयाने पर्यायी व्यवस्था केल्याने बालकांवरील हा धोका टळला. ही घटना सोलापूर जिल्ह्यात नावलौकिक असलेल्या डॉ. शीतल शहा यांच्या पंढरपूर (Pandharpur) मधील रूग्णालयातील आहे. येथे डॉ. शीतल शहा यांचे नवजीवन बालरोग रुग्णालय (Navjivan Pediatric Hospital) असून तेथे अतिदक्षता विभाग आहे. ज्यासाठी जेनरेटर स्टार्टर बॅटरीची सोय करण्यात आली आहे. मात्र भंगारवाल्याने चोरीच्या उद्देशाने त्या काढल्याने तेथील 69 बालकांचा जीव धोक्यात आला होता. दरम्यान बॅटरी (Battery) चोराविरोधात पंढरपूर शहर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून त्या भंगारवाल्याचा शोध सुरू आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पंढरपूरमध्ये डॉ. शितल शहा यांचे नवजीवन हॉस्पिटल आहे. येथे नवजात बालकांवर उपचार केले जातात. काल सकाळी रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जनरेटर जवळ मोठा आवाज झाला. तो इलेक्ट्रिशियन युवराज सावंत यांच्या लक्षात आला. त्यावेळी त्यावेळी नेमका आवाज कसाल झाला हे पाहण्यासाठी युवराज सावंत रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस गेले असता तेथे जेनरेटर स्टार्टर बॅटरी कोणी तरी काढल्याचे लक्षात आले. त्याचवेळी रुग्णालय कर्मचाऱ्यांनी जवळपास बॅटरी शोधण्याचं प्रयत्न केला. यावेळी भारत सुखदेव माने हा व्यक्ती बॅटरी घेऊन झुडुपात पळून जाताना दिसला. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्याला हाका मारत थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो थांबला नाही.
दरम्यान बॅटरी काढल्याने अतिदक्षता विभागात असलेल्या 69 बालकांचा जीवाला धोका निर्माण झाला होता. पण डॉ. शितल शहा यांनी प्रसंगावधान राखत पर्यायी व्यवस्था केली. यामुळे त्या वॉर्डातील बालकांच्या जीवावरील धोका टळला. यानंतर डॉ. शीतल शहा यांनी याप्रकरणी भंगारवाल्याविरोधात पंढरपूर शहर पोलिसांत फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिस त्या भंगारवाल्याचा शहरात शोध घेत आहेत.