Beed | वाळू माफियांनी पोलिसांच्या अंगावरच घातली गाडी

Beed | वाळू माफियांनी पोलिसांच्या अंगावरच घातली गाडी

| Updated on: Mar 17, 2022 | 6:04 PM

बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यात वाळू माफियांवर (Mafia) कारवाई करण्यास गेलेल्या पोलीस (Police) हवालदारावर वाळू माफियांकडून थेट ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला आहे. वेळीच पोलिसांनी प्रसंगावधान दाखवल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यात वाळू माफियांवर (Mafia) कारवाई करण्यास गेलेल्या पोलीस (Police) हवालदारावर वाळू माफियांकडून थेट ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला आहे. वेळीच पोलिसांनी प्रसंगावधान दाखवल्याने पुढील अनर्थ टळला आहे. दरम्यान, गेवराई पोलीस ठाण्यात तीन वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेनंतर वाळू माफियांनी घटनास्थळावरून पळ काढला. गेवराई तालुक्यातील खामगाव आणि सावरगाव परिसरात कारवाईदरम्यान सदरील घटना घडली आहे. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये पाच वाहनांसह 19 ब्रास वाळू असा एकूण तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात वाळूमाफियांनी उच्छाद मांडला असून पोलिसांनीही कंबर कसली आहे. या वाळूमाफियांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस गेले असता त्यांच्यावरच गाडी घालण्यात आली आहे. दरम्यान, पळून गेलेल्या वाळू माफियांचा शोध आता पोलीस घेत आहेत.