विशाळगडावरील अतिक्रमणाचा पुन्हा वाद पेटला, शिवसेना ठाकरे गटाने घेतली आक्रमक भूमिका

कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कुदळ फावडे असं साहित्य घेऊन शिवसैनिक विशाळगडाकडे रवाना झाले असून जोरदार घोषणाबाजी केली आहे.

विशाळगडावरील अतिक्रमणाचा पुन्हा वाद पेटला, शिवसेना ठाकरे गटाने घेतली आक्रमक भूमिका
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 9:39 AM

कोल्हापूर : कोल्हापूर येथील ठाकरे गटाचे शिवसैनिक विशाळगडाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी सरकारकडून प्रतापगड येथील अफझल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण काढल्यानंतर शिवभक्तांनी शिंदे सरकारचे अभिनंदन केले होते. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी अफझल खानाची कबर झाली आता विशाळगडावरील अतिक्रमण काढावे अशी मागणी शिंदे सरकारकडे केली होती. संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसे पत्रही दिले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. असे असतांना कोल्हापुरातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिंदे सरकारला इशारा दिला होता. त्यानुसार कोल्हापूर येथील ठाकरे गटाचे संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण हटविण्यासाठी विशाळगडावर फावडे आणि कुदळ घेऊन रवाना झाले आहे.

विशाळगडावरील अतिक्रमणावरून कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक झाला असून फावडे आणि कुदळ घेऊन ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी धाव घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कुदळ फावडे असं साहित्य घेऊन शिवसैनिक विशाळगडाकडे रवाना झाले असून जोरदार घोषणाबाजी केली आहे.

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाने ही मोहीम सुरू केली असून अतिक्रमण काढणारच अशी ठाम भूमिका घेलती आहे.

विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसैनिक जाणार असल्याने स्थानिक पोलीसांनी किंवा प्रशासन त्यांना रोखणार की अतिक्रमण काढू देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

राज्यातील गड किल्ल्यांवर ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे, हे अतिक्रमण काढण्यासाठी शिंदे सरकारनेही सकारात्मक भूमिका घेलती असून विविध संघटनांनी अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे.

एकूणच विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाल्याने अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.