Thane Slab Collapse : ठाण्यात कामगार रुग्णालयात टेरेसच्या सुरक्षाभिंतीचा स्लॅब कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही

आपत्ती व्यवस्थापन आणि अग्नीशमन दलाचे स्लॅब हटवण्याचे आणि रुग्णांना इतरत्र हलवण्याचे काम सुरु केले. सुदैवाने स्लॅब कोसळल्यानंतर कोणतीही जीविहानी, वित्तहानी किंवा कुणीही जखमी झाले नाही.

Thane Slab Collapse : ठाण्यात कामगार रुग्णालयात टेरेसच्या सुरक्षाभिंतीचा स्लॅब कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही
ठाण्यात कामगार रुग्णालयात टेरेसच्या सुरक्षाभिंतीचा स्लॅब कोसळलाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 10:38 PM

ठाणे : ठाण्यातील वागळे परिसरात कामगार रुग्णालया (Kamgar Hospital)चा तिसऱ्या मजल्यावरील टेरेसच्या सुरक्षारक्षक भिंतीचा स्लॅब (Wall Slab) कोसळल्याची घटना आज घडली आहे. आवाजाच्या भीतीने रुग्णालयात उपचार घेणारी एक महिला खाटेवरुन खाली पडली. विमल शेट्ये (73) असे या महिलेचे नाव आहे. यामध्ये त्यांच्या हनुवटीला जखम (Injured) झाली असून 4 ते 5 टाके लावण्यात आले आहेत. कोणतीही जीवितहानी झाली नसून रुग्णालयातील उपचार घेणाऱ्या 9 जणांना बाजूच्या दुसऱ्या इमारतीत हलवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान 1-फायर वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि अग्नीशमन दलाचे स्लॅब हटवण्याचे आणि रुग्णांना इतरत्र हलवण्याचे काम सुरु केले. सुदैवाने स्लॅब कोसळल्यानंतर कोणतीही जीविहानी, वित्तहानी किंवा कुणीही जखमी झाले नाही.

मुंब्रा बायपासवर पुन्हा एकदा दरड कोसळली

मुंब्रा बायपास रोडवर आज दुपारी पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी जेसीबी मशिनसह, अग्निशमन दलाचे जवान, रेस्क्यू वाहन आणि इमर्जन्सी वाहनासह दाखल झाले. दरड बाजूला करण्याचे काम सुरू केले. दुपारी 1 च्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार पनवेलकडून ठाण्याकडे येणाऱ्या लेनवर मुंब्रा बायपास रोडवर दरड कोसळली.

हे सुद्धा वाचा

पालघरमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत कोसळली

पालघर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पळे बोरीपाडा येथील शाळेच्या इमारतीची भिंत मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झाली आहे. सुदैवाने ही दुर्घटना रात्री घडल्याने कोणत्याही विद्यार्थ्याला अथवा शिक्षकाला इजा झाली नाही. पालघर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून याच पावसामुळे ही भिंत कोसळल्याचं समोर आलंय. (The slab of the security wall of the kamgar hospital terrace collapsed in Thane)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.