CCTV : पारधी समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कधी बदलणार? चोर नाही सांगण्यासाठी आता त्यांनीच बसवले सीसीटीव्ही

यावेळी भटके विमुक्त संघटनेचे समन्वयक अरुण जाधव यांनी सांगितले की, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या डॉ बाबासाहेब आंबडेरांनी दिलेल्या याच मूलमंत्रावर काळे कुटुंब चालत आहे. मात्र बुरसटलेले विचार घेऊन चालणाऱ्या शासकीय यंत्रणा ब्रिटिशाने लावलेला गुन्हेगारीचा कलंक पुसण्याऐवजी अधिक घट्ट करत आहेत.

CCTV : पारधी समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कधी बदलणार? चोर नाही सांगण्यासाठी आता त्यांनीच बसवले सीसीटीव्ही
सीसीटीव्ही Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 9:50 PM

बीड : स्वातंत्र्यपुर्व काळात एखाध्या ठिकाणी चोरी (Theft) झाली की सगळ्यात आधी ज्यांना पकडले जायचे तो समाज म्हणजे आदिवासी पारधी समाज. त्यांच्यावर ब्रिटिशांनी गुन्हेगारीचा शिक्काच मारलेला होता. त्यामुळे आजच्या या 21 व्या शतकात आदिवासी पारधी समाजाच्याबाबतीत काही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. कारण आजही ब्रिटिशांनी (British) मारलेला गुन्हेगारीचा शिक्का आदिवासी पारधी समाजावर दिसतो. काही झालं की संशयाची सुई ही आधी यासमाजाकडे फिरवली जाते. मांजर जरी कुठं गेलं की ग्रामीण भागात पारध्यानं नेलं असंच म्हटलं जातं. तर ग्रामीणसह शहरी भागात चोरी होऊ नये म्हणून सीसीटीव्ही (CCTV)बसविले जातात. बीडमध्ये मात्र आम्ही चोर नाही हेच सिद्ध करण्यासाठी एका पारधी कुटुंबाने शक्कल लढवली आहे. ज्यामुळे त्याची चर्चा सध्या बीड जिल्ह्यात सध्या जोरदार सुरू आहे. या कुटुंबाने तंत्रज्ञानाला जवळ करत आपल्यावर कोणतीही संशयाची सुई येऊ नये म्हणून घराबाहेर सीसीटीव्ही बसविले आहेत. हे ऐकून आपल्याला नवल वाटत असले तरी पुरोगामी महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणेच्या डोळ्यात अंजन घालणारं हे वास्तव आहे.

चारही बाजूने ओसाड डोंगर आणि त्यामध्ये हे घर

बीड जिल्हा तसा मागास आहे. येथील लोक आजही उसतोडमजूर म्हणून इतर जिल्ह्यात जातात. यात आदिवासी पारधी समाजाचाही समावेश आहे. त्यामुळे कुठे चोरी झाली की आधी पारधी समाजाला किंवा तेथील कुटुंबाला बळीचा बकरा बनवण्यात येते. याचे कारण ब्रिटिशांनी मारलेला गुन्हेगारीचा शिक्का. आणि बुरसटलेले विचार घेऊन चालणारी आपली शासकीय यंत्रणा. यातून सुटण्यासाठी येथील शामल काळे यांनी शक्कल लढवली आहे. ते पारधी आहेत. तर त्यांचे घर चारही बाजूने ओसाड डोंगराच्यामध्ये गावकुसाच्या बाहेर डोंगरमाथ्यावर असलेल्या ठिकाणी आहे. आणि या छोट्याशा घराबाहेर सीसीटीव्ही लावण्यात आलं आहे. यामुळेच हे घर सध्या राज्यात प्रसिद्धी झोतात आलं आहे.

कुटुंबाला लक्ष केले जातं

गावात अथवा परिसरात एखादी गुन्हेगारी घटना घडली की सर्वात आधी याच कुटुंबाला लक्ष केले जातं. मात्र आपण त्या गुन्ह्यात सहभागी नसून निर्दोष आहोत. असं सिद्ध करण्यासाठी या कुटुंबातील शामल काळे या मुलाने घराच्या चारही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत.

हे सुद्धा वाचा

गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो

काळे कुटुंब थोडीफार असलेली शेती कसून आपला उदरनिर्वाह करत. तर शामल हा शिरूर इथल्या एका शाळेत दहावीच शिक्षण घेत आहे. त्याची शिक्षणाची मोठी जिद्द, चांगलं शिक्षण घेऊन मोठा अधिकारी बनण्याचं स्वप्न तो उराशी बाळगून आहे. मात्र वारंवार ज्या गुन्ह्यात सहभाग नाही. त्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने हे कुटुंब पुरते हतबल झाले आहे. त्यातूनच बाहेर पडण्यासाठी आपण घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतल्याचे शामल काळे यांनी सांगितलं आहे.

राज्यातील पहिलीच घटना

तर याबाबत शामल काळे यांच्या पत्नी अर्चना काळे यांनी प्रतिक्रीया देताना, एखाद्या पारधी समाजाच्या घरावर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे ही राज्यातील पहिलीच घटना म्हणावी लागेल, असे म्हटले आहे. आम्हाला देखील समाजात इतरां प्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमच्या वर होणारा अन्याय सिद्ध करण्यासाठी उचललेलं हे पाऊल असल्याचं भटके विमुक्त संघटनेचे समन्वयक अरुण जाधव सांगत आहेत.

आंबडेरांनी दिलेल्या मूलमंत्रावर काळे कुटुंब

यावेळी भटके विमुक्त संघटनेचे समन्वयक अरुण जाधव यांनी सांगितले की, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या डॉ बाबासाहेब आंबडेरांनी दिलेल्या याच मूलमंत्रावर काळे कुटुंब चालत आहे. मात्र बुरसटलेले विचार घेऊन चालणाऱ्या शासकीय यंत्रणा ब्रिटिशाने लावलेला गुन्हेगारीचा कलंक पुसण्याऐवजी अधिक घट्ट करत आहेत. ही पुरोगामी आणि उज्वल्य म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्राला सणसणीत चपराक आहे.

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.