भाजपच्या पदाधिकाऱ्यानेच शिंदे गटाच्या आमदाराच्या विरोधात थोपटले दंड…मालेगावातील मुक्काम आंदोलन चिघळलं…
बोरी आंबेदरी धरण बंदिस्त पाईप लाईन विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणून गणेश कवचे या आंदोलकाने विष प्राशन केले आहे.
मनोहर शेवाळे, मालेगाव ( नाशिक ) : पालकमंत्री राजीनामा द्या अशा प्रकारचे विविध फलक घेऊन मालेगाव येथील काही गावकरी दादा भुसे यांच्या विरोधात आक्रमक झाले आहे. मालेगावच्या बोरी आंबेदरी धरण बंदिस्त पाईप लाईन विरोधात आक्रमक झालेल्या आंदोलकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. एका आंदोलकाने विष प्राशन करत त्याचे लाईव्ह केले आहेत. गणेश कचवे असे या आंदोलकाचे नाव आहे. त्याला तातडीने मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असून तो मृत्युंशी झुंज देत आहे. धरणातून बंदिस्त पाईप लाईनच्या ऐवजी कॅनल ने पाणी पुरवठा योजना राबवावी अशी मागणी केली जात आहे. यामध्ये गावागावांमध्ये दोन गट पडल्याने वाद पेटला आहे. कॅनलद्वारे पाणी योजना राबवण्यास पालकमंत्री यांनीच पुढाकार घेतल्याने त्यांच्याविरोधात वातावरण तापले आहे.
बंधिस्त कालवा नसावा यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी, ग्रामस्थ गेल्या 28 दिवसांपासून सहकुटुंब आंदोलन करीत आहे. मात्र, याकडे शासकीय यंत्रणेने देखील आता दुर्लक्ष केले आहे.
बोरी आंबेदरी धरण बंदिस्त पाईप लाईन विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणून गणेश कवचे या आंदोलकाने विष प्राशन केले आहे.
त्याचे पडसाद आता मालेगाव परिसरात उमटले आहे, मालेगावच्या विधायक संघर्ष समितीच्या वतिने आणि भाजपसह इतर संघटनांनी महात्मा गांधी पुतळ्या जवळ धरणे आंदोलन सुरू केले आहे.
यावेळी तीव्र निदर्शने करत आंदोलक पालकमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून दोषी अधिकाऱ्यां विरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
बोरी आंबेदरी धरण बंदिस्त पाईप लाईन ऐवजी कॅनलच्या माध्यमातूनच पाणी पुरवठा करण्याची मागणी केली जात आहे असल्याने हा मुद्दा मालेगावमध्ये अधिकच चिघळला आहे.
या आंदोलनात भाजपचे अद्वय हीरे यांनी दादा भुसे यांच्या विरोधात दंड थोपटले असून शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेत राजीनाम्याची मागणी केली आहे.