Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report: जीवन नशीलं, राज्यसत्ता कारस्थान अन् राज्य लोकांना भ्रष्ट करणारं षडयंत्र; सत्य उच्चारून श्वास सोडणाऱ्या ‘लिओ’ची चित्तरकथा!

तो म्हणायचा, जीवन नशीलं आहे. नशा असेल, तरच जगता येतं. नशा उतरली की कळतं, जीवन एक लबाडीही आहे, एक मूर्खपणाही. त्याची पुस्तकं वाचली की, जगणं अजूनही नशीलं होतं. फुलांना वास येतो. आपल्या आसपासची माती लाल चमकते.

Special Report: जीवन नशीलं, राज्यसत्ता कारस्थान अन् राज्य लोकांना भ्रष्ट करणारं षडयंत्र; सत्य उच्चारून श्वास सोडणाऱ्या 'लिओ'ची चित्तरकथा!
लिओ टॉलस्टॉय.
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 10:17 AM

तो म्हणायचा, जीवन नशीलं आहे. नशा असेल, तरच जगता येतं. नशा उतरली की कळतं, जीवन एक लबाडीही आहे, एक मूर्खपणाही. पुढं तो असंही म्हणायचा, सत्य हेच आहे की राजसत्ता हे कारस्थान आहे. राज्य हे रचना केलेलं असं षडयंत्र की, तिथं केवळ शोषणच होत नाही तर, लोकांना भ्रष्टही केलं जातं. हेच तो पुस्तकातूनही मांडत राहिला. त्याची ही पुस्तकं वाचली की, जगणं अजूनही नशीलं होतं. फुलांना वास येतो. आसपासची माती लालबुंद चमकते. त्याला आयुष्यभर साधेपणानं भुरळ घातलेली. रुसोच्या विचारांचा त्याच्यावर पगडा. भौतिकता नव्हे, साधेपणात सुख आहे. गरजा कमी ठेवाल, तर जीवन सुंदर जगाल. नव्हे, ते आपोआप सुंदर होईल, असा त्याचा विश्वास. मात्र, तो रशियातला उमराव. त्यानं पुस्तकं लिहूनही त्या काळी चिक्कार पैसा कमावला. त्याचा जन्म 9 सप्टेंबर 1828 चा. त्यानं 20 नोव्हेंबर 1910 रोजी या जगाचा निरोप घेतला. आपण बोलतोय लिओ टॉलस्टॉयबद्दल….

लहानपणापासून एकांत…

लिओ टॉलस्टॉय. त्याचं मूळ घराणं जर्मनीतलं. रशियात येऊन स्थिरावलेलं. त्याच्या वडिलांनी एका राजकन्येशी लग्न केलं. लिओचं वय अवघं तीन. तेव्हा आई गेली. सहाव्या वर्षी वडीलही. तो एकटा पडला. तिथूनच तासन तास एकांतात रहायची, विचार करायची सवय त्याला जडली. शिक्षण पूर्ण केलं. काही काळ सैन्यात भरती झाला. युद्ध लढला. जिंकला. सैनिकांमधली नितळता, निरागसता, देशप्रेम खूप जवळून अनुभवलं. जेव्हा हे सगळं सोडून आला, तेव्हा त्याला देशातलं चित्र वेगळंच दिसलं. सगळीकडं ओरबडणं सुरू. स्वार्थीपणा, सुखलोलुपता. राजकारण पाहून त्याला प्रचंड चीड यायची. त्यात त्याला रुसो नावाच्या रसायनानं झपाटलेलं. त्यामुळं वैयक्तिक आयुष्यात एकदम साधेपण आलेलं. ते अखेरपर्यंत सुटलं नाही.

त्याची शाळा बंद…

टॉलस्टॉयनं एक शाळाही काढली. तो तिथं फुकट शिकवायचा. कसलीही फी नाही. शिक्षणाचं दडपण नाही. ज्याला जे हवं, त्यानं ते शिकावं. मुलं त्यांना वाटेल तेव्हा शाळेत येत. वाटेल तेव्हा जात. जिथं सक्ती तिथं राष्ट्राचं कल्याण नाही, असं त्याला वाटायचं. ही शाळा काही दिवस चालली. ती तो कुठंही भरवी. घरात. जागा कमी पडली तर, शेजारच्या घरात. त्याची शिक्षणविषयक मतं त्यांन एका पुस्तकातूनही मांडली. मात्र, ती सरकारला पटणं शक्य नव्हतं. त्यामुळं अपेक्षेप्रमाणं या शाळेचा प्रतिसाद कमी कमी होत गेला. शेवटी ती बंद करावी लागली. त्याला वाटलं आपण शाळा पुन्हा सुरू करावी. मात्र, त्याचे असे विचार, अशी शाळा त्या काळी पटणं अशक्य होतं. अर्थातच ही शाळा पुन्हा सुरू करायला परवानगी सपशेल नाकारली गेली.

तो अबोला धरायचा…

लिओ टॉलस्टॉयला तेरा मुलं होती. तो त्यांच्यासोबत खूप खेळायचा. दंगामस्ती करायचा. त्यांच्यावर मात्र त्यानं शिक्षणाचे कसलेही प्रयोग केले नाहीत. त्यांना कधी मारलंही नाही. मुलांच्या कोणत्या गोष्टी आवडल्या नाहीत, तर तो फक्त अबोला धरायचा. मुलांना कळायचं, बाबा का रुसलाय ते. शिष्ट प्रज्ञावंतांपेक्षा सामान्य माणूस परवडला, असंच तो म्हणायचा. स्वत:ही तो तसाच जगायचा. आपल्या गरजा कमी ठेवा. सुख तुमच्यापाठीमागे धावत येईल, हे त्याचं साधं तत्वज्ञान होतं. आपण का जगतो, कसं जगावं याप्रश्नांची उत्तरं त्याला आयुष्याच्या शेवटपर्यंत सापडली नाहीत. ती त्यानं त्याच्या पुस्तकातून, कादंबऱ्यातून शोधण्याचा प्रयत्न केला.

लिओ टॉलस्टॉयची ‘वॉर अॅण्ड पीस’ कादंबरी.

गद्यातलं महाकाव्य लिहिलं…

लिओ टॉलस्टॉयची ‘वॉर अॅण्ड पीस’ ही कादंबरी तर गद्यातलं महाकाव्य. एकोणीसाव्या शतकातली राजकीय, सामाजिक परिस्थिती लिओनं त्यात जिवंत केली. जो भोवताल जगला, तो जिवंत केला. त्यामुळंच तो म्हणायचा, ‘या कादंबरीत साहित्यिक गुण दुय्यम आहेत. मी जे आहे ते मांडलंय. समाजाचं प्रामाणिक, ज्वलंत चित्रण केलंय. ते खरोखर बेमालूम उतरलंय.’ मग त्याच्या मते कादंबरी कशी असावी. ती खरी कादंबरी कोणती होती, तर ती होती ‘अॅना कारनिना’. एका स्वैर जीवन जगणाऱ्या मुलीची गोष्ट. जी पुढे लबाड लोकांचा बळी पडली. ढोंगी, जमीनदारी समाजव्यवस्थेची शिकार झाली. शेतकऱ्यांचे भले करणाऱ्या जमीनदाराने तिचा उपभोग घेतला.

अॅना कारनिना कादंबरीवर अनेक चित्रपट निघाले.

रखेलीपासून सुचली गोष्ट…

रशियातल्या एका रेल्वे थांब्यावर एका जमीनदाराच्या रखेलीनं आत्महत्या केली. या घटनेनं लिओ सुन्न झाला. तिचं नाव अॅना होतं. त्यावेळेस त्याला तिच्या आपल्या कादंबरीतली एक खलनायिका दिसली. त्यानं तिच्यावर लिहायला सुरुवात केली. तेव्हा तिनं त्याच्या मेंदूचा असा काही कब्जा घेतला, की एक रत्न बाहेर पडलं. त्या कादंबरीची तीच नायिका झाली. अॅना कारनिना. एका जमीनदाराची बायको. एक तरणा बांड, अविवाहित लष्करी अधिकारी तिच्या प्रेमात पडतो. सुरुवातीला त्याला झिडकारणारी अॅना. एका मुलाची आई. ज्याच्यावर तिचं जीवापाड प्रेम असतं. ती तिच्याही नकळत त्या अधिकाऱ्याच्या प्रेमात पडते. नवरा, मुलगा सगळं सोडून त्याच्यामागे धावत जाते. तिचा नवराही तिच्यावर तितकंच प्रेम करायचा. ती आजारी असते. शेवटचे क्षण. ती नवऱ्याला पत्र लिहून बोलवणं धाडते. तो येतो. तिच्या प्रियकरासह स्वीकारायला तयार होतो. त्याचा मोठेपणा पाहून ती पुन्हा नवऱ्याकडं खेचली जाते. तिच्या मनाची अशी घालमेल. मुलासाठी तिळतिळ तुटणं. मनानं पुन्हा प्रियकराकडं ओढ घेणं. हे सगळे खेळ लिओनं अफलातून चितारलं. अॅना प्रियकरासोबत राहू लागते. शेवटी त्याच्यावर ती संशय घेऊ लागते. त्यामुळं त्याला शहर सोडून दूर एका गावात घेऊन जाते. आपला सुंदर प्रियकर दुसऱ्या तरुणींच्या प्रेमात आहे. पडेल. या संशयानं तिला इतकं झपाटतं की त्यातच ती एका रेल्वेखाली उडी घेते. आपल्या जीवनाचा शेवट करते.

अभिनयसम्राज्ञी ग्रेटा गार्बोनं एक अॅना साकारली.

ग्रेटा गार्बोनं साकारली अॅना…

लिओ टॉलस्टॉयच्या ‘अॅना कारनिना’ कादंबरीवर दोन, तीन सिनेमे आले. अभिनयसम्राज्ञी ग्रेटा गार्बोनं एक अॅना साकारली. ‘लव्ह’ या चित्रपटातून. इथं कादंबरीच्या अगदी विरुद्ध जाऊन चित्रपटाचा शेवट गोड केला गेला. व्हिव्हियन ली या अभिनेत्रीनंही अॅना साकारली. या कलाकारांना समीक्षकांनी नावाजलं. मात्र, अॅना कारनिना ही कादंबरी काही चित्रपटांना झेपली नाही. या कादंबरीतला अॅनाचा जमीनदार नवरा लिओनं स्वत:ला पाहून रेखाटल्याचं म्हटलं जातं. अॅना कारनिना आणि वॉर अॅण्ड पीस कागदावर उतरवतानाचा कधी तरी त्याला वाटून गेलं. हे जीवन नशीलं आहे. नशा असेल, तरच जगता येतं. नशा उतरली की कळतं, जीवन एक लबाडीही आहे, एक मूर्खपणाही. त्यामुळंच तो म्हणायचा सत्य हेच आहे की, राजसत्ता हे कारस्थान आहे. राज्य हे रचना केलेलं असं षडयंत्र की, तिथं केवळ शोषणच होत नाही तर, लोकांना भ्रष्टही केलं जातं. हेच तो पुस्तकातूनही मांडत राहिला. त्याची ही पुस्तकं वाचली की, जगणं अजूनही नशीलं होतं. फुलांना वास येतो. आपल्या आसपासची माती लाल चमकते.

व्हिव्हियन ली या अभिनेत्रीनंही अॅना साकारली.

अन् तिथंच कोसळला…

लिओ टॉलस्टॉयला जीवनाच्या संध्याकाळी त्याला ही सगळी धनदौलत वाटून टाकायची होती. त्यानं हा विचार पत्नीला बोलून दाखवला. झालं. घरात वादळ उठलं. त्याला एखादा साधू व्हायचं होतं. भिकार जगायचं होतं. मात्र, म्हातारपणामुळं ते ही शक्य नव्हतं. तशात त्याला न्यूमोनिया झालेला. पत्नी, मुली त्याची रांत्रंदिवस सेवा करत होत्या. त्यानं कुणालाही न सांगता घर सोडलं. रेल्वेस्थानक गाठलं. त्याला दूरवर जायचं होतं कुठंतरी, पण तो तिथंच कोसळला. त्यानं एकच ध्यास घेतलेला. मला कुणीही थांबवू नका. एखादा गरीब शेतकरी हे जग कसं सोडून जातो, अगदी तसं मला जाऊ द्या. तो त्यानं पूर्ण करायचा प्रयत्न केला, पण त्याला ते म्हणावं तसं जमलं नाही. त्यानं त्याच रेल्वे थांब्यावर प्राण सोडले. तेव्हा त्याचा शेवटचा शब्द होता ‘सत्य’.

इतर बातम्याः

VIDEO: आरोग्य खात्याच्या परीक्षेच्या पेपरफुटीची चौकशी करा, अन्यथा सीबीआयकडे जाऊ; गोपीचंद पडळकरांचा इशारा

कल्याणमध्ये शिवसेनेला खिंडार पडणार?, माजी आमदार भाजपच्या वाटेवर?; उलटसुलट चर्चांना उधाण

मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'.
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार.
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.