मुख्यमंत्री शिंदे यांनी दर्शन घेतलेल्या मंदिर संस्थानाला अंनिसचं आव्हान, थेट लाखों रुपयांचं बक्षीस जाहीर केलं

मुख्यमंत्री यांनी रुद्र पुजा करण्यास अंनिसचा विरोध नाही. भारतीय संविधानाने प्रत्येकास श्रद्धा व उपासनेचा आधिकार दिला आहे. परंतु, संबधित व्यक्तीची ख्याती पहाता ही पुजा भविष्यातील अडचणीवर मात करण्यासाठी केलेला तोडगा असावा असे अंनिसला संशय आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी दर्शन घेतलेल्या मंदिर संस्थानाला अंनिसचं आव्हान, थेट लाखों रुपयांचं बक्षीस जाहीर केलं
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 2:05 PM

नाशिक : अंकाद्वारे भविष्य पाहणे हे शास्त्र आहे हे सिध्द करा व एकवीस लाख रुपये जिंका असं आव्हान अंनिसने ईशान्येश्वेर संस्थानला दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांना सोबत घेऊन ईशान्येश्वर मंदिरात भविष्य पाहिल्याची चर्चा सध्या चालु आहे. ईशान्येश्वर मंदिरातील संबधीत व्यक्ती यांनी काल प्रसारमाध्यमांतून असे जाहिर केले की, सदर ठिकाणी कुंडली पाहिली जात नाही किंवा हात ही पाहिले जात नाही. त्यांचा हा दावा अंनिसला मान्य आहे. कारण संबधित व्यक्ती अंकशास्त्राचा अभ्यासक आहे. अंकशास्त्रात कुंडली अथवा हात पाहिला जात नाही. त्यांनी ज्योतिष पाहत असल्याचा दावा खोडून काढला नाही. ते अंकशास्त्राच्या आधारे भविष्य पाहत नसेल तर तसा फलक त्यांनी मंदिरात लावावा व जनता फसवणूकीपासून दुर राहावी म्हणुन तसे हमीपत्र लिहून द्यावे. अन्यथा अंकशास्त्र हे शास्त्र असल्याचे सिध्द करावे. तसे केल्यास अंनिस जनतेतून मिळविलेले एकवीस लाख रुपये त्यांना बक्षीस देईल, असे आव्हान महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री यांनी रुद्र पुजा करण्यास अंनिसचा विरोध नाही. भारतीय संविधानाने प्रत्येकास श्रद्धा व उपासनेचा आधिकार दिला आहे.

परंतु, संबधित व्यक्तीची ख्याती पहाता ही पुजा भविष्यातील अडचणीवर मात करण्यासाठी केलेला तोडगा असावा असे अंनिसला संशय आहे. कारण ही पुजा अमावस्येला केली गेली असल्याचे अनिसने म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा

इतकेच नव्हे तर ही पुजा करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी शिर्डीच्या नावाखाली दौरा आयोजित केला की काय अशी शंका उपस्थित होते. मुंबईच्या महत्त्वाच्या बैठका रद्द करून व गोपनीयता राखत प्रोटोकॉल तोडून हा दौरा झाल्याचा दावा अनिसने केला आहे.

मुख्यमंत्र्यांना रुद्र पुजा करायची तर मुंबईला अथवा कुठेही करु शकत होते. मात्र ईशान्येश्वर मंदिरात केली. कारण अंकशास्त्राच्या आधारे भविष्य पाहुन हा तोडगा केला असावा, असा संशय अंनिसला आहे. . पालकमंत्री यांनी पूजेला अंधश्रद्धा म्हणणे चुकीचे असल्याचे सांगीतले आहे. महाराष्ट्र अंनिस सर्वांच्या श्रद्धा व उपासनेचा आदर करते परंतु कोणताही शास्त्रीय आधार नसलेल्या ज्योतिषाला विरोध करते.

कारण ज्योतिष हे शास्त्र नसुन थोतांड आहे. ते स्वप्न विकण्याची कला आहे. जनतेने अशा लोकांपासून दुर रहावे व अंधानुकरण करू नये, असं कृष्णा चांदगुडे यांनी म्हटले आहे.

एकूणच अंनिस ने केलेल्या आव्हानाला मंदिर संस्थान काही प्रतिसाद देते का ? यावर काही प्रतिक्रिया देते का ही बघणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....