बेळगाव सीमा प्रश्नी सभागृहात पडसाद उमटणार? ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी कुणाला पाठविली नोटीस ?

स्थगन प्रस्तावाची नोटीस पाठविली असून पहिल्या दिवशीच ठाकरे गटाचे खासदार सभागृहात आक्रमक होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बेळगाव सीमा प्रश्नी सभागृहात पडसाद उमटणार? ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी कुणाला पाठविली नोटीस ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 9:58 AM

प्रदीप कापसे, दिल्ली : कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वाद अधिकच तापला आहे. ठिकठिकाणी या वादाचे पडसाद उमटतांना बघायला मिळत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकमध्ये न येण्याचा फतवा काढल्याने वातावरन अधिकच चिघळले आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील बसेसला अडवून त्यांची तोडफोड आणि त्यांना अडवणूक केल्याचे दिसून येत होते. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही ठिकठिकाणी बस अडवून त्यांना काळे लावले आहेत. जय महाराष्ट्र असा भगव्या रंगाने लिहिण्यात आले आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न अधिकच चिघळला असल्याने राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेच्या सभापतींना नोटिस पाठवून यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाच्या प्रश्नावर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची राज्यसभेच्या सभापतींना नोटीस पाठविली आहे.

सभागृहात कर्नाटक महाराष्ट्रात सीमावादावरून निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा व्हावी अशी मागणी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

स्थगन प्रस्तावाची नोटीस पाठविली असून पहिल्या दिवशीच ठाकरे गटाचे खासदार सभागृहात आक्रमक होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाचे पडसाद उमटतांना दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या मागणीवर काय निर्णय होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

शरद पवार यांनीही कर्नाटक सरकारला इशारा देत मला कर्नाटकात यावं लागेल असं म्हंटल्याने राजकीय वातावरण देखील तापले आहे, महाराष्ट्रातील नागरिकांचा रोष वाढू नये यासाठी तात्काळ चर्चा व्हायला हवी असा सुर आता आवळला जात आहे.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.