नागपूर : उपचारासाठी पैसे पाहिजे म्हणून दोन ठिकाणी चाकूच्या धाकावर लुटपाट (Looting at knife point ) करण्यात आली. नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशन हद्दीत आणि नंदनवन पोलीस (Nandanvan Police) स्टेशन हद्दीत भर दुपारी लुटपाट करण्यात आली. पहिली घटना इतवारी मार्केटमधील जैन मंदिराजवळची तर दुसरी वाठोडा रोडवर घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. लुटपाट केलेल्या दोन्ही ठिकाणी आरोपीने चालक म्हणून नोकरी केली होती. नागपुरात एका आरोपीने दोन ठिकाणी चाकूचा धाक दाखवत लुटपाट केल्याची घटना समोर आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलीस तपासात उपचारासाठी पैश्याची गरज असल्याने लुटपाट केल्याची आरोपीने कबुली दिली. महत्वाचं म्हणजे या दोन्ही ठिकाणी आरोपीने चालक म्हणून नोकरी केली होती.
नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे रोहित शाह यांचे इतवारी मार्केट, जैन मंदिराजवळ अमृत पॅलेस येथे घर आहे. या इमारतीमध्ये भर दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्यांची मुलगी ही घरात एकटी होती. आरोपीने दुपारच्या वेळी घरात प्रवेश करून मुलीच्या गळ्यावर चाकू लावला. पैसे आणि दागिने मागितले. तिच्याच जवळ पैसे नसल्याने या तरुणीने जवळचे atm कार्ड आणि कानातील रिंग त्या आरोपीला दिले. त्यानंतर आरोपी पसार झाला.
नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत दुपारी 4 वाजताच्या दरम्यान कमला इंगळे वय 60 वर्ष घरी एकटे होते. वाठोडा रोडवर राहणाऱ्या इंगळे यांच्या घरी पण आरोपीने चाकू दाखवून सोन्याची चेन घेऊन फरार झाला. दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या तरी पद्धत एकच होती. पोलिसांनी कसून तपास सुरू केला. आरोपीला 12 तासांमध्ये तहसील पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने अटक केली. आरोपीने आपला गुन्हा मान्य केला असल्याची माहिती एसीपी सचिन थोरबोले यांनी दिली.
आरोपीने कबुली दिली की, मला एक आजार आहे. त्याच्या उपचारासाठी 50 ते 60 हजार रुपये खर्च लागणार आहे. त्यासाठी मी हे काम केले. महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी त्याने ही लुटपाट केली त्या दोन्ही ठिकाणी आरोपीने एकएक महिना चालक म्हणून नोकरी केली होती.