महाराष्ट्रातील धरणांची पाण्याची पातळी खालावली, ५६ धरणांनी तळ गाठला
Maharashtra News : महाराष्ट्रात यावर्षी मान्सून एक महिना उशिरा दाखल झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची अजूनही टंचाई आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे.
महाराष्ट्र : महाराष्ट्रातील (MAHARASHTRA) बहुतांश जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक धरणं (DAMP)अद्याप कोरडी असल्याचं पाहायला मिळालं आहे. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, तिथं धरणात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर काही छोटी धरणं भरली सुद्धा आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात (WATER LAVEL) मागच्या काही दिवसात चांगला मुसळधार पाऊस झाला आहे, त्यामुळे तिथल्या धरणात समाधानकारक पाणी असल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप अनेक भागाकडे पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे लोकांना अजूनही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
राज्यातील ५६ धरणांनी यंदाच्यावर्षी तळ गाठला होता. काही धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात १६ मुख्य धरणं आहेत. त्यामध्ये आज ५२ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याचं दिवशी ५५ टक्के पाणीसाठी होता.
अमरावती विभागात १० मुख्य धरणं आहेत. त्यामध्ये ४४ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी पाण्याचासाठा ६३ टक्के होता. औरंगाबाद विभागात ४४ मुख्य धरणं आहेत. सध्याचा पाणीसाठी ३१ टक्के आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी ६० टक्के पाणीसाठा होता. नाशिक जिल्ह्यात २३ मुख्य धरणं आहेत. सध्याचा पाणीसाठा ३६ टक्के आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी पाणीसाठा ६७ टक्के होता. पुणे विभागात मुख्य ३५ धरणं आहेत. यावर्षी २१ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी ५५ टक्के पाणीसाठा होता. कोकणात ११ मुख्य धरणं आहेत. सध्याचा पाणीसाठा ५० ट्क्के आहे. गेल्यावर्षी याचदिवशी ८४ टक्के होता.
नाशिक जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ
नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. गंगापूर धरणात 39, कश्यपी 20, तर गौतमी धरणात 15 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी जुलैच्या पंधरवड्यात गोदावरीला पूर आला होता. शहरात आतापर्यंत केवळ 113 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाची स्थिती
कोल्हापुरात जिल्ह्यातील राधानगरी धरण 50 टक्के भरले आहे. सध्या धरणात 4.18 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात 6.15 टीएमसीहुन पाणीसाठा अधिक होता. जिल्ह्यातील इतर धरणातील पाणीसाठी चिंताजनक आहे. काळमवाडी धरणात केवळ 5.18 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवसात काळमवाडी धरणात 14 टीएमसी पाणीसाठा होता. जिल्ह्याच्या अनेक भागात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.
खडवासला धरणात इतका पाणीसाठा
खडकवासला धरण क्षेत्रात मागच्या वर्षाच्या तुलनेत निम्म्याने पाणीसाठा कमी आहे. गेल्या 24 तासात खडकवासला धरण क्षेत्रात 0.13 टीएमसी इतका पाण्याचा तयार झाला आहे. खडकवासला धरण क्षेत्रात सध्या 8.50 म्हणजेच 29 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. टेमघर येथे 20 मिलीमीटर, पानशेत येथे 8 व वरसगाव येथे 7 मिलीमीटर पाऊस पडला आहे. दिवसाअखेर टेमघरमध्ये 16.67 टक्के, वरसगावमध्ये 29.33, पानशेतमध्ये 29.80 व खडकवासला धरणात 48.31 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
हे धरण भरलं
राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण 100 टक्के क्षमतेने भरलय. त्यामुळे धरणामध्ये पाणीसाठा पूर्ण क्षमतेने झाल्यानंतर मध्यरात्रीपासून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.
या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आलाय
गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नाले, नदी, तलाव हे भरले असून त्यामुळे आता हळूहळू धरण साठ्याच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणामध्ये कालीसरार, पुजारी टोला हे धरण मोठ्या प्रमाणात भरले असून या धरणातून पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे.