तोंडाच्या पिचकाऱ्या पडल्या महागात… कोर्टात थुंकल्याने जामीनच रद्द; राज्यात ‘या’ ठिकाणी घडला प्रकार

आरोपीला जामीन मिळाला होता, मात्र न्यायालयाच्या परिसरातील वेटिंग रुममध्येच तो आरोपी थुंकला आणि ते पाहून त्याचा जामीन तत्काल रद्द करण्याचा निर्णय न्यायाधीशांनी घेतला.

तोंडाच्या पिचकाऱ्या पडल्या महागात... कोर्टात थुंकल्याने जामीनच रद्द; राज्यात 'या' ठिकाणी घडला प्रकार
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 2:02 PM

चोरीच्या प्रकरणात अटक झालेल्या आरोपीला न्यायालयाकडून जामीन मिळाला होताच, पण त्याच्या एका कृत्याने त्याने स्वत:च्या पायावरच धोंडा मारून घेतला. कोर्टाच्या आवारात असताना तेथेच थुंकल्याने न्यायालयाने त्या आरोपीचा जामीन तत्काळ रद्द केला आणि त्याची पुन्हा तुरूंगातच रवानगी झाली. यवतमाळ जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या परिसरात घडलेल्या या घटनेची लोकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. तोंडाच्या पिचकाऱ्या त्या आरोपीला भलत्याच महागात पडल्याची चर्चा लोकांमध्ये रंगली आहे.

नेमकं झालं तरी काय ?

गोविंदा मनोज जाधव असे आरोपीचे नाव आहे. चोरीच्या प्रकरणात एक वर्षाची शिक्षा आणि हजार रुपये दंड वणी विद्यमान न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी वणी न्यायालयाने गोविंद याला सुनावली होती. या प्रकरणात 22 जुलैला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात त्याने अपिल केली. न्यायालयाने त्याला जामीन मंजूरही केला. मात्र या कालावधीतच आरोपी गोविंद याने गुटखा खाल्ला आणि न्यायालय परिसरात असलेल्या प्रतीक्षालयातील खांबावर तीन वेळा पिचकारी मारली. आणि नेमकी हीच बाब न्यायाधीश हेमंत सातभाई यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसली. ते पाहताच त्यांनी आरोपीचा जामीन रद्द केला आणि त्याला पुन्हा तुरुंगाची हवा खावी लागली.

गोविंदा मनोज जाधव या आरोपीने न्यायालयाच्या परिसरात थुंकल्याने 12 ऑगस्ट त्याला नोटीस बजावून या प्रकरणी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. 12 ऑगस्टला तो परत न्यायालयात आला असता त्याने मद्य प्राशन केल्याचं समोर आलं. वैद्यकीय तपासणीतही ही बाब उघड झाली. त्याने केलेले गैरवर्तन सिद्ध झाल्याने, तसेच जामिनावर राहण्याच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी त्याची कारागृहात रवानगी केली. तोंडाच्या पिचकाऱ्या त्या आरोपीला खूप महागात पडल्या.

'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.