CCTV Video : भाईंदरमध्ये गुडविन कंपनीत चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीमध्ये रस्त्यावर भीक मागणाऱ्या महिला दिसत होत्या. एक ऑफिसमध्ये चोरी करण्यासाठी घुसली तर दुसरी पहारा देत होती.

CCTV Video : भाईंदरमध्ये गुडविन कंपनीत चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
भाईंदरमध्ये गुडविन कंपनीत चोरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 5:23 PM

भाईंदर : भाईंदर पश्चिमेचा नवघर रोडवर असलेल्या गुडविन कंपनीच्या ऑफिसमध्ये चोरी (Theft)ची घटना उघडकीस आली आहे. दोन महिला 2 जुलै रोजी सकाळी या ऑफिसमध्ये घुसल्या आणि किंमती वस्तू (Expensive Items) घेऊन पसार झाल्या. ही सर्व घटना ऑफिसमधील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सकाळी कर्मचारी ऑफिसमध्ये आल्यानंतर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपी महिलांचा शोध घेत आहेत.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु

गुडविन कंपनीचे कर्मचारी नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसमध्ये आले असता ऑफिसमध्ये चोरीची घटना उघड झाली. कार्यालयातील किंमती वस्तू गायब होत्या. त्यानंतर तात्काळ नवघर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीमध्ये रस्त्यावर भीक मागणाऱ्या महिला दिसत होत्या. एक ऑफिसमध्ये चोरी करण्यासाठी घुसली तर दुसरी पहारा देत होती. आत घुसलेल्या महिलेने ऑफिसमधील किंमती वस्तू घेतल्या. त्यानंतर दोघींनी पोबारा केला. नवघर पोलीस सीसीटिव्हीच्या माध्यमातून आरोपी महिलांचा शोध घेत आहेत.

वसईत चोरी करायला आलेल्या चोरट्याला नागरिकांनी चोपले

वसईत ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्याला नागरिकांनी बेदन चोप दिला आहे. त्यानंतर चोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वसई पूर्वेच्या गौराई पाडा परिसरातील साईनगर भागात या ठिकाणी यास्मिन ज्वेलर्स आहे. या ज्वेलर्समध्ये रात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. दुकानावरील पत्रे तोडून चोरट्याने आथ प्रवेश केला. आजूबाजूच्या नागरिकांना जाग आल्याने त्यांनी दुकानाकडे धाव घेत चोरट्याला रंगेहाथ पकडले. (Theft at Goodwin Company in Bhayander, incident captured on CCTV camera)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.