भाजप नेत्यांची महिलांबाबतची डझनभर प्रकरणं सांगेन, संजय राठोड मीडिया ट्रायलचा बळी: वडेट्टीवार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट भूमिका घेऊन योग्य केले. लवकरच याप्रकरणातील सत्य बाहेर येईल. | Vijay Wadettiwar
चंद्रपूर: संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीनामा ही मीडिया ट्रायलची परिणती आहे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) यांनी केले. भाजप नेत्यांची महिलांबाबतीच डझनभर प्रकरणे मला सांगता येतील. पण भाजप नेत्यांसाठी नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. (Vijay Wadettiwar reaction on Sanjay Rathod resignation news)
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी चंद्रपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट भूमिका घेऊन योग्य केले. लवकरच याप्रकरणातील सत्य बाहेर येईल, असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर दादा भुसेंची प्रतिक्रया, म्हणाले…
मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेच्या गोटातून सावधपणे प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचा कोणताही नेता संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना दिसत नाही. तसेच याबाबतीत अंतिम निर्णय हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील, असे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे.
राज्याचे कृषीमंत्री आणि शिवसेना नेते दादा भुसे यांनीही संजय राठोड यांच्याविषयी सावधपणे प्रतिक्रिया दिली. संजय राठोड हे आमचे सहकारी मित्र आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मला काहीही माहिती नाही. जी वस्तुस्थिती आहे, ती चौकशीनंतर समोर येईल, असे दादा भुसे यांनी सांगितले.
मोठी बातमी : खुद्द पोलीस महासंचालक मैदानात, हेमंत नगराळे पूजा चव्हाण केसची माहिती घेण्यासाठी पुण्यातhttps://t.co/sjZj8r0CRK @SatavDoke #hemantNagrale #PoojaChavan #sanjayRathod #Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 16, 2021
शिवसेनेत दोन गट
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरुन शिवसेनेत दोन गट पडल्याची चर्चा आहे. राठोड यांनी राजीनामा देऊ नये, असे सेनेतील एका गटाचे म्हणणे आहे. यापैकी एक गट नैतिकता जपण्यासाठी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशा मताचा आहे. तर दुसरा गट संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये, असे म्हणत आहे.
संबंधित बातम्या :
अखेर संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला
राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही, आता तातडीने गुन्हा दाखल व्हावा: निलेश राणे
मुंडेंच्या तीन बायका, तरी पवारांनी वाचवलं, आता राठोडांना ठाकरे वाचवतात, सोमय्या आक्रमक
(Vijay Wadettiwar reaction on Sanjay Rathod resignation news)