‘मामा’ रुग्णालयात असतांना फडणवीस यांनी केले कॉंग्रेसमधील ‘ऑपरेशन’, फडणवीस यांनी एका दगडात ‘किती’ पक्षी मारले?
सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राज्यातील राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय खेळीची चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक : कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीतील युवा नेता सत्यजित तांबे यांनी नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावरून राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय खेळीची चर्चा होऊ लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्याबद्दल पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात एक मोठं विधान केलं होतं. कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेले सत्यजित तांबे यांना किती दिवस बाहेर ठेवणार, अशा चांगल्या लोकांवर आमचा डोळा असतो. असं म्हंटलं होतं. आणि त्याच वेळी सत्यजित तांबे यांना आमदार होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आणि त्याचनंतर फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांची स्क्रिप्ट लिहिल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात किती पक्षी मारले आहे? याची चर्चा सुरू झाली आहे. त्याच दरम्यान थोरात-तांबे यांच्या घरात कलह सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात असून दुसरींकडे कॉंग्रेसला फडणवीस यांनी धक्का दिला आहे. याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील यांनाही चेकमेट दिल्याची बोललं जात आहे.
सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आहेत, त्यांच्याच भाचाला तिकीट देण्याची रणनीती देवेंद्र फडणवीस यांनी आखली होती.
तर दुसरींकडे राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात असतांना त्यांनाही एकप्रकारे चेकमेट देऊन फडणवीस यांनी तांबे यांना पाठबळ दिले आहे.
तर तिसरीकडे बाळासाहेब थोरात हे रुग्णालयात असतांना सत्यजित तांबे यांना आमदार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसमध्ये ऑपरेशन केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरणे, वडील सुधीर तांबे यांना एबी फॉर्म आलेला असतांना निवडणुकीतून माघार घेणे, आणि भाजपनेही उमेदवार न देणे ही फडणवीस यांची राजकीय खेळी असल्याचे बोललं जात आहे.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात तीन पक्षी मारल्याची चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू असून बाळासाहेब थोरात हैराण झाले असणार तर दुसरींकडे विखे पाटील यांनाही चेकमेट दिला आहे.
त्यामुळे विखे पाटील यांची डोकेदुखी वाढण्याबरोबरच थोरात आणि तांबे यांच्या घरात कलह सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नसून कॉंग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे.