थिएटर चालक-मालकांनी घेतली धास्ती, “या” शहरात हर हर महादेवचे एकही शो नाहीत
संभाजीराजे छत्रपती यांनी हर हर महादेव या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी या चित्रपटावर ताशेरे ओढले आहे.
नाशिक : नुकताच हर हर महादेव हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आहे. यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने देखील संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे. राज्यातील विविध संघटना संभाजीराजे यांनी घेतलेल्या आक्षेपाला पाठिंबा देत आहे. ठिकठिकाणी हर हर महादेवचे शो बंद पाडले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील सर्वच थिअटर चालक-मालकांनी एकही शो सुरू ठेवलेला नाही. नाशिकमधील सर्वच शो अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आले असून संभाजीराजे छत्रपती, राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी यांनी घेतलेल्या आक्षेपावर चांगलीच धास्ती घेतली आहे. महाराष्ट्रभर हर हर महादेव या चित्रपटावर आक्षेप घेतला जात असून मोठा वाद उभा राहिला आहे. हर हर महादेव आणि 2023 मध्ये प्रदर्शित होणारा वेडात मराठे वीर दौडले सात हा चित्रपट या चित्रपटाला राज्यभरातून जोरदार विरोध होत आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी हर हर महादेव या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी या चित्रपटावर ताशेरे ओढले आहे.
याचीच धास्ती थिअटर मालक आणि चालकांनी घेतल्याचे दिसून आले असून एकही शो नाशिकमध्ये सुरू नसून बूकिंगसाठी उपलब्ध नाही.
हर हर महादेव या चित्रपटातील वेशभूषा योग्य नसून इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला जात असल्याचा आक्षेप घेतला होता, त्यावरून राज्यभर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.
चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड होत असून येणाऱ्या पिढी यातून काय शिकेल, इतिहास चुकीचा असल्यास गाठ माझ्याशी आहे अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली होती.
सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आम्ही खपवून घेणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वंशज या नात्याने माझा या चित्रपटाला विरोध असल्याचे संभाजीराजे यांनी म्हंटलं आहे.
त्यातच राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी, संभाजी ब्रिगेड यांनी देखील विरोध दर्शविला असून विविध ठिकाणी हर हर महादेव या चित्रपटाचे शो बंद पाडले जात आहे.