नाशिक महापालिकेत महाविकास आघाडी फिस्कटली; काँग्रेस प्रभारींनी काय दिले आदेश?

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करत उमेदवारांची चाचपणी केलीय. तर आता दुसरीकडे काँग्रेसनेही स्वबळाचे संकेत दिलेत. काँग्रेसचे शहर प्रभारी ब्रिजकिशोर दत्त दोन दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून होते. यावेळी त्यांनी हे संकेत दिले.

नाशिक महापालिकेत महाविकास आघाडी फिस्कटली; काँग्रेस प्रभारींनी काय दिले आदेश?
Congress Flag
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 1:26 PM

नाशिकः राज्यातील सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस या पक्षांमध्ये नाशिक (Nashik) महापालिकेत (Municipal Corporation) राजकीय आघाडी फिस्कटल्यात जमा आहे. एकीकडे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करत उमेदवारांची चाचपणी केलीय. तर आता दुसरीकडे काँग्रेसनेही स्वबळाचे संकेत दिलेत. काँग्रेसचे शहर प्रभारी ब्रिजकिशोर दत्त दोन दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून होते. यावेळी त्यांनी हे संकेत दिले. तसेच पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्याही सूचना दिल्या. तर शिवसेनेनेही स्वबळाची तयारी पूर्ण केलीय. त्यामुळे निवडणूक रंगणार आहे.

काँग्रेस प्रभारी काय म्हणाले?

प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर साऱ्याच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केलीय. आक्षेपावर सुनावणी झाली की, कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. विशेषतः एप्रिल महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्या पार्श्वभूमीवर नाशिक काँग्रेसचे प्रभारी ब्रिजकिशोर दत्त यांनी विभागनिहाय बैठका घेतल्या. प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी इच्छुकांना आपल्यापल्या वॉर्डात निवडणुकीची तयारी सुरू करण्याच्या सूचना दिल्या. शिवाय डिजिटल मेंबरशीप वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन केले. त्यांनी आघाडीसोबत जाणार का, यावर वक्तव्य करणे टाळले. मात्र, एकंदर एकला चलो रेचे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेत.

शिवसेनेचे काय?

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने स्वबळाचे संकेत दिलेत. तर शिवसेनेने पूर्वीपासूनच यासाठी जोरदार तयारी केलीय. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंसह शिवसेना नेत्यांची फळी नाशिक दौऱ्यावर होती. त्यावेळीही महापालिकेच्या रणनीतीवर मंथन झाले.आताही शिवसेनेने एकदम सुमडीत तयारी सुरू केलीय. इच्छुकांनी आपपल्या वॉर्डात प्रचारावर भर दिलाय. विशेषतः दुबार मतदारांचा मुद्दा नाशिकमध्ये शिवसेनेनेच काढला होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच शिवसेना इथे सक्रीय आहे.

प्रभागांची तोडफोड

नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत एकूण 211 हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी 4 पथके तयार केली आहेत. आता यावर येत्या 23 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्याकडे समस्त नाशिककरांचे लक्ष लागले आहे. बहुतांश इच्छुकांनी काही मातब्बर मंडळींनी स्वतःच्या सोयीसाठी प्रभागांची मोडतोड केल्याचा आरोप केलाय. यापूर्वीही एका नगरसेवकाच्या घरात बसून प्रभाग रचना तयार केल्याची चर्चा महापालिकेतच रंगली होती.

अशी होणार निवडणूक…

– त्रिसदस्यीय पद्धतीने प्रभाग

– आता 133 नगरसेवक

– एकूण प्रभाग 44

– 43 प्रभाग 3 सदस्यीय

– 1 प्रभाग 4 सदस्यीय

पक्षीय बलाबल

– भाजप – 66 (एका नगरसेवकाचे निधन. सध्या 64)

– शिवसेना – 35 (सध्या 33)

– राष्ट्रवादी – 6

– काँग्रेस – 6

– मनसे – 5

– अपक्ष – 4

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.