Loksabha Election 2024 : मोठी बातमी! ‘हे’ सात आमदार लढणार लोकसभेची निवडणूक? कुणाला देणार टेन्शन?

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीवर आपले लक्ष केंदित केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेऊन भाजप आगामी निवडणूक लढविणार आहे. तर, ठाकरे गट, शरद पवार गट आणि कॉंग्रेस यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यासाठी नव्या दमाचे उमेदवार भाजप देणार आहे.

Loksabha Election 2024 : मोठी बातमी! 'हे' सात आमदार लढणार लोकसभेची निवडणूक? कुणाला देणार टेन्शन?
LOKSABHA ELECTION 2024Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 5:41 PM

मुंबई : 30 सप्टेंबर 2023 | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने चाचपणी सुरू केलीय. भाजपने यावेळीची निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. राज्यातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा चंग भाजपने बांधलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेऊन ही निवडणूक भाजप लढणार आहे. यासाठी भाजप नव्या दमाची फौज निवडणुकीत उतरवणार आहे अशी माहिती मिळतेय. लोकसभा निवडणूक हमखास जिंकू शकतात अशा 7 आमदारांना भाजप लोकसभेची तिकीट देणार आहे अशी बातमी समोर आलीय. यात तीन विद्यमान मंत्री आहेत. तर, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचाही यात समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकसभेच्या ४५ प्लस मिशनसाठी भाजपकडून मोठी रणनिती आखली जात आहे. नेत्यांची मतदारसंघातील लोकप्रियता आणि जातीय समीकरणं पाहून भाजप या आमदारांना खासदारकीसाठी उतरवणार असल्याचे म्हटले जात आहे. पाहू कोण आहेत हे मंत्री आणि आमदार

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदार संघातून प्रथमच निवडून आले आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात उडी घेतली. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना विधानपरिषदेत आमदारकी देण्यात आली. 2019 च्या निवडणुकीआधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कुलाबामधून ते निवडून आले. उद्धव ठाकरे यांचे सरकार जाऊन शिंदे सरकार आले. या सत्ताबदलात राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष झाले. राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून लोकसभा तिकीट मिळण्याची शक्यता आहे. येथे शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत हे दोन वेळा निवडून आले आहेत.

हे सुद्धा वाचा

वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

भाजपचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजप चंद्रपुरमधून संधी देण्याची शक्यता आहे. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांची सरदार पटेल महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेच्या सचिवपदी नियुक्ती झाली. 1989 आणि 1991 मध्ये त्यांनी चंद्रपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. 1993 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष झाले. 1995 मध्ये त्यांनी चंद्रपूर विधानसभा निवडणूक लढविली आणि 55,000 इतक्या विक्रमी मतांधिक्याने जिंकली. तेव्हापासून आजतागायत हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. 2010 ते 2013 या काळात ते भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते. महाराष्ट्राचे अर्थमंत्री, क्रीडामंत्री, वनमंत्री अशी विविध खाती त्यांनी सांभाळली आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरमधून कॉंग्रसचे सुरेश धानोरकर यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला होता. त्यामुळे ही जागा पुन्हा भाजपकडे खेचून आणण्याचे आव्हान मुनगंटीवार यांच्यासमोर असेल,

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघातून 1995 पासून आतापर्यंत गिरीश महाजन निवडून आले आहेत. 1978 पासून ते राजकारणात आहेत. अभाविपचे तालुकाध्यक्ष ते आताचे विद्यमान मंत्री असा त्यांचा प्रवास राजकीय आहे. जळगावच्या राजकारणात एकनाथ खडसे यांचे वर्चस्व महाजन यांनी मोडीत काढले. जळगावमध्ये रावेर आणि जळगाव असे दोन लोकसभा मतदार संघ आहेत. जळगाव मतदार संघात उन्मेष पाटील आणि रावेरमध्ये खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे असे दोन विद्यमान खासदार आहेत. एकनाथ खडसे यांनी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे रक्षा खडसे यांना डावलून गिरीश महाजन यांना रावेर मतदार संघातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली या विधानसभा मतदारसंघातून रवींद्र चव्हाण हे 2009, 2014 आणि 2019 निवडणुकीत विजयी झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्यांचे ते राज्यमंत्री होते. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली. कल्याण डोंबिवली या लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत.

रवींद्र चव्हाण हे पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. पालघरमध्ये शिंदे गटाचे राजेंद्र गावित तर सिंधूदुर्गमध्ये शिवसेनेचे विनायक राऊत विद्यमान खासदार आहेत. सिंधूदुर्गमधून रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी दिल्यास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार नितेश राणे यांचे काय? असा प्रश्न आहे. त्यामुळे रविंद्र चव्हाण यांना कुठून संधी मिळणार? याची उत्सुकता आहे.

ठाण्याचे आमदार संजय केळकर

ठाणे मतदारसंघामधून संजय केळकर हे दोन वेळा निवडून आले हेत. यापूर्वी ते विधानपरिषदेत आमदार होते. ठाण्यात ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. विचारे विरुद्ध केळकर असा सामना ठाण्यात होऊ शकतो.

आमदार राम सातपुते

भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून राम सातपुते यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2016 मध्ये राम यांची महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव म्हणून निवड झाली. 2019 च्या निवडणुकीत त्यांना बीडच्या माळशिरस मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते उत्तम जानकर यांचा पराभव केला. भाजयुमोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असणारे राम सातपुते यांना बीड लोकसभा मतदारसंघातून यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. येथे भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे या विद्यमान खासदार आहेत.

आमदार आकाश फुंडकर

माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत पांडुरंग फुंडकर यांचे आकाश फुंडकर हे चिरंजीव आहे. आकाश फुंडकर हे भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. खामगाव हा त्यांचा विधानसभा मतदार संघ आहे. आकाश फुंडकर यांना अकोला किंवा बुलडाणा येथून संधी मिळण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.