राष्ट्रवादीचे ‘हे’ तीन बडे नेते आगामी निवडणूक लढवणार नाहीत, कारण…

राष्ट्रवादीत पडलेल्या या फुटीमुळे पक्षातील काही आमदारांना थेट निर्णय न घेता तटस्थतेची भूमिका घेतली आहे. ना शरद पवार यांना सोडून जाता येत ना अजित पवार यांना थेट विरोध करता येत त्यामुळे 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशी या आमदारांची तसेच काही पदाधिकाऱ्यांची अवस्था झाली आहे.

राष्ट्रवादीचे 'हे' तीन बडे नेते आगामी निवडणूक लढवणार नाहीत, कारण...
AJIT PAWAR VS SHARAD PAWAR
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 10:53 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंड करून अजित पवार यांनी स्वतंत्र गट निर्माण केला. शिवसेना भाजप युती सरकारमध्ये अजित पवार यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या या फुटीमुळे पक्षातील काही आमदारांना थेट निर्णय न घेता तटस्थतेची भूमिका घेतली आहे. ना शरद पवार यांना सोडून जाता येत ना अजित पवार यांना थेट विरोध करता येत त्यामुळे ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी या आमदारांची तसेच काही पदाधिकाऱ्यांची अवस्था झाली आहे. मात्र, अजित पवार यांची साथ देऊनही एका बड्या नेत्याने थेट निवडणूक लढवणार नाही असे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर आणखी एका आमदार आणि खासदारानेही तशीच भूमिका घेतली आहे.

निर्णय घेणं अवघड – आमदार अतुल बेनके

हे सुद्धा वाचा

माझ्या मनात शरद पवार यांच्याबद्दल आदर आहेच. तोच आदर अजित पवार यांच्याबद्दलही आहे. पण, पहिलं स्थान हे दिलीप वळसे पाटील यांना आहे. मी पवार कुटुंबासोबत जोडलो गेलो आहोत त्यामुळे निर्णय घेणं अवघड आहे.

माझी भूमिका तटस्थ आहे. विकास कामासाठी ज्यांच्याकडे जावे लागेल. त्यांच्याकडे मी जाणार आहे. पण, पक्ष आणि राज्यातील ही राजकीय परिस्थिती पाहता 2024 ची विधानसभा निवडणूक लढविण्याची माझी मानसिकता नाही. मी निवडणूक लढविणार नसलो तरी समाज कार्यात कार्यरत असेल असे स्पष्ट करत जुन्नर मतदारसंघाचे आमदार अतुल बेनके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मंत्री झालेले दिलीप वळसे पाटील नाराज आहेत का?

शरद पवार यांचे पीए ते आमदार, विधानसभा अध्यक्ष, गृहमंत्री असा प्रवास केलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांची साथ दिली. अजित पवार यांच्यासोबत त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांनीही आगामी निवडणूक लढणारा नाही असे वक्तव्य केलंय.

आमदार रोहित पवार यांनी साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवं अशा आशयाची एक पोस्ट केली होती. त्याला उत्तर देताना दिलीप वळसे पाटील यांनी मी जितकी वर्ष राजकारणात आहे तितके तुमचे वयही नाही. सधर पवार याचू साथ का सोडली याचे कारण सांगतानाच तुम्ही आंबेगावमधून निवडणूक लढा, मी पुढील निवडणूक लढणार नाही असे आव्हानही त्यांनी रोहित पवार यांना दिले.

अमोल कोल्हे यांचा खासदारकीचा राजीनामा

अजित पवार यांच्या शपथविधी वेळी उपिस्थत असलेले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दुसऱ्याच दिवशी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. पक्षात पडलेली फूट आणि झालेली द्विधा मनस्थिती यामुळे हा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.

जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।

असे ट्विट करून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. त्यांनीही आगामी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....