सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो : नितीन गडकरी

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या परखड शैलीसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. अनेकदा आपल्या भाषणातून ते सरकारचे कानही उपटत असतात. यावेळीही त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकारच्या कामाच्या पद्धतीवर बोलताना त्यांनी सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो, असं मत व्यक्त केलं.

सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो : नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Sep 01, 2019 | 7:52 PM

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या परखड शैलीसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. अनेकदा आपल्या भाषणातून ते सरकारचे कानही उपटत असतात. यावेळीही त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकारच्या कामाच्या पद्धतीवर बोलताना त्यांनी सरकार जिथं हात लावतं, तिथं सत्यानाश होतो, असं मत व्यक्त केलं. ते नागपूरमध्ये मदर डेअरी (Mother Dairy) कार्यक्रमात बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, “वामन पै (Waman Pai) यांनी तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे हा संदेश दिला होता. तेव्हापासून मी कधीही सरकारकडे मदतीला जात नाही. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ध्येय्यावर मी चालतो. मी माझ्या कोणत्याही प्रकल्पासाठी सरकारकडे मदत मागत नाही. मदत तर दूर पण आपल्याकडं सरकार जिथं हात लावतं तिथं सत्यानाशच होतो. सरकारने काही चांगलं काम केलं तर त्याचं कौतुक पण करतो. मात्र, मी कधीही सरकारकडं मदत मागायला जात नाही.”

‘विदेशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय निघतो तेव्हा लाज वाटते’

विदेशात गेल्यावर तेथेही भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर (Farmer Suicide) बोललं जातं. हे ऐकूण लाज वाटते, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते म्हणाले, “शेतकऱ्यांना समृद्ध आणि संपन्न करणे हाच आमचा उद्देश आहे. मी माझं आयुष्य याच कामासाठी दिलं आहे. ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होतील, त्या दिवशी मी हे काम करणं बंद करेल. मी विदेशात जातो तेव्हा तेथील लोक मला विचारतात की तुमच्याकडे इतके शेतकरी आत्महत्या का करतात? हे ऐकूण मला लाज वाटते.”

यावेळी त्यांनी संपूर्ण विदर्भात गाड्यांसाठी जे इंधन वापरलं जातं त्यात 10 टक्के इथेनॉल (Ethanol) असतं, हेही नमूद केलं. तसेच बायोडिझेलविषयी (Bio Diesel) माहिती देत त्याचा शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.