राणेंच्या बंगल्यावर पालिका पहिल्यांदा गेलेली नाही, केंद्रानं सांगितलंय CRZ चं उल्लंघन झालंय, किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य!

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहू येथील बंगल्याच्या तपासणीसाठी मुंबई महापालिकेचं पथक सध्या पोहोचलं आहे. जुहू येथील राणेंच्या अधीश या बंगल्यात अनधिकृत बांधकाम असल्याची नोटीस मुंबई महापालिकेने त्यांना यापूर्वीच दिली होती.

राणेंच्या बंगल्यावर पालिका पहिल्यांदा गेलेली नाही, केंद्रानं सांगितलंय CRZ चं उल्लंघन झालंय, किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य!
किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 10:06 PM

मुंबईः नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहू येथील बंगल्यावर आज बीएमसीचं (BMC) पथक पोहोचलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या,’राणे यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेचं पथक काही पहिल्यांदा गेलेलं नाही. यापूर्वीदेखील त्यांना नोटीस देण्यात आली होती. त्यांच्या घरी महापालिकेचं पथकही गेलेलं आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या सीआरझेड कायद्यालं उल्लंघन केल्याची तक्रार आहे, त्याच्याच तपासणीसाठी महापालिकचं पथक गेलं आहे. स्वतः राणे साहेबांनी सांगितलं होतं. काही पोर्शन अनधिकृत जाणवतोय, त्यामुळे हे पथक चौकशीसाठी आलं होतं. आताही हे पथक चौकशी करतंय. राणे साहेबही त्यांना सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे.’

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

त्यानुसार महापालिकेचं पथक दाखल झाल्यावर तुम्ही स्वतः कागदपत्र वगैरे घेऊन तयार रहावे, अशी नोटीस बीएमसीने दिली होती. त्यानुसार आज सोमवारी मकेंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याच्या तपासणीसाठी मुंबई महापालिकेचं पथक सध्या पोहोचलं आहे. जुहू येथील राणेंच्या अधीश या बंगल्यात अनधिकृत बांधकाम असल्याची नोटीस मुंबई महापालिकेने त्यांना यापूर्वीच दिली होती.हापालिकेचं आठ अधिकाऱ्यांचं पथक राणेंच्या जुहू येथील बंगल्यात दाखल झाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, महापालिकेचं पथक राणे यांच्या घरी पहिल्यांदाच गेलेली नाहीये. केंद्र सरकारनेदेखील यापूर्वी या प्रकरणी आक्षेप नोंदवलेले आहेत.

CRZ चं उल्लंघन केल्याचा आरोप

जुहू चौपाटीवर अगदी हाकेच्या अंतरावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अधीश नावाचा बंगला आहे. या बंगल्याच्या बांधकामात सीआरझेड नियमांचं उल्लंघन, अनधिकृत बांधकाम आणि FSI चा वाढीव उपयोग केला गेला आहे, असे आरोप लावण्यात आले आहेत. लेआउटमध्येही बदलण्यात आला आहे, असाही आरोप करण्यात आला आहे. 2017 मध्ये नारायण राणे यांच्याविरोधात तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तक्रारदाराने अल्टिमेटल दिलं असून या तक्रारीबाबात काय झालं, असा सवाल विचारला आहे. त्यानंतर आता  या आरोपांची चौकशी आणि तपासणीसाठी बीएमसीच्या अधिकाऱ्यांचं पथक आज अधीश बंगल्यावर पोहोचले आहे. महापालिकेच्या पथकाला मोठ्या प्रमाणात पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे.

इतर बातम्या-

CCTV | कोल्हापूरच्या ‘नादखुळा’ पोरांमुळे बाईकचोरांचे ‘टांगा पल्टी घोडे फरार’, दोन सराईत चोर जाळ्यात

पांढरे सोने तेजीतच राहणार, शेतकऱ्यांचा ‘तो’ निर्णय आजही फायदेशीर..! वाचा सविस्तर

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.