शरद पवार यांच्या रडारवर अजितदादा गटाचे हे आमदार, कोण करतंय मनधरणी?

२ जुलै हा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भूकंप घडविणारा ठरला. राष्ट्रवादीचे 'दादा' नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी काडीमोड घेत भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांच्यासोबत असणारे काही आमदार शरद पवार यांच्याकडे परत आले. तर काहींनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

शरद पवार यांच्या रडारवर अजितदादा गटाचे हे आमदार, कोण करतंय मनधरणी?
NCP LEADER SHARAD PAWAR AND AJIT PAWARImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 9:00 PM

मुंबई : गेला महिनाभर जाणार जाणार असे म्हणता म्हणता अखेर अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलाच. अजित दादा एकटेच गेले नाही तर सोबत अर्धा पक्षही फोडून नेला. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देऊन अजित पवार यांनी राजकारणातील आपली ‘पॉवर’ दाखवून दिली. अजित दादा यांच्या शपथविधीवेळी उपस्थित असलेले काही आमदार, खासदार यांची त्यावेळी द्विधा मनस्थिती झाली होती. त्यातील काही आमदार तटस्थ राहिले होते. तर काही आमदारांनी अजित पवार यांना आपला थेट पाठिंबा दिला. परंतु, या सर्व राजकीय परिस्थितीमुळे शिवसेना पक्षासारखीच स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. त्यामुळे, आता शरद पवार यांनी अजितदादा यांच्या गटातील आमदारांवर आपली नजर वळवली आहे.

अजित पवार यांनी मंत्रपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांच्यासोबत किती आमदार आहेत असा प्रश्न विचारण्यात येत होता. पण, दुसऱ्याच दिवशी बांद्रा येथील एमआयटीमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ३४ आमदार उपस्थित राहिल्याने शरद पवार यांना दादांनी मोठे आव्हान दिल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यातील काही आमदारांनी शरद पवार यांच्याशी संपर्क केला तर शरद पवार यांच्याकडील काही आमदारांनी अजित पवार यांच्याशी संधान बांधले.

हे सुद्धा वाचा

दोन्ही पवारांमध्ये हा पाठशिवणीचा खेळ सुरु होता. दोन्ही गट एकमेकांचे आमदार आपल्याकडे कसे येतील यासाठी गळ टाकून बसले आहेत. त्यात तळ्यात मळ्यात असलेल्या आमदारांना दोन्ही गटाकडून संपर्क साधला जात आहे. मात्र, यात शरद पवार गट अधिक सक्रिय झाला आहे.

शरद पवार यांचा गट अजित पवार यांच्या गटातील कोणते आमदार आपल्या गोटात येतील याची चाचपणी करत आहेत. त्यानुसार त्या आमदारांशी संपर्क केला जात असून त्यांना माघारी फिरण्याचे संदेश पोहोचवण्यात येत आहे.

काय आहे संदेश

ठोस भूमिका घ्या, संघर्षाची भूमिका ठेवा, योग्य निर्णय घ्या आणि विचार करून कळवा असा संदेश काही आमदारांना शरद पवार यांच्या गटाकडून देण्यात येत आहे. असा संदेश गेल्यानंतर काही आमदार आपलीकडे पुन्हा येतील अशी आशा शरद पवार गटाला वाटत आहे.

मंत्रिपद मिळत नसल्याने नाराज

अजित पवार यांच्यासोबत मोठ्या विश्वासाने गेलो. पण, चौकश्यांचा ससेमिरा असणार्यांनाच पुन्हा मंत्रिमंडळात घेतले. मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर दाखवून आपल्याला थांबवून ठेवले अशी नाराजी आमदार माणिकराव कोकाटे, अतुल बेनके आणि किरण लहामटे यांनी व्यक्त करत वेगळी भूमिका घेण्याचं ठरवलं.

शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. पण, त्यांना सोडून आल्यानंतरही सत्तेत वाटा मिळत नसेल तर वेगले झालेले बरे असे या आमदारांचं म्हणणं आहे. मात्र, त्यातील अकोल्याचे आमदार किरण लहामटे यांनी मतदारसंघात निधी मिळाला नाही, जनतेची कामे झाली नाही तर जनता मला जाब विचारेल त्यामुळे मी अजित पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर करत आपले पाऊल मागे घेतले.

हे आमदार शरद पवार गटाच्या रडारवर

अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांना शरद पवार गटाकडून संपर्क साधण्यात येत आहे. आमदार रोहित पवार हे थेट काही आमदारांशी संपर्क साधत आहेत. अतुल बेनके, मकरंद पाटील, चेतन तुपे, किरण लमहाटे, आशुतोष काळे यांच्यासह अन्य आमदारांना संपर्क साधला जात आहे. यातील काही आमदार माघारी फिरले तरी शरद पवार यांच्यासाठी तो दिलासा असेल.

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.