‘जे पक्षातून फुटलेत त्यांना पदावरून दूर करावं’; मुंबई हायकोर्टात महत्वाची याचिका दाखल

महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांमध्ये दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांमध्ये दोन गट तयार झाले आहेत. अशातच यासंदर्भातील मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

'जे पक्षातून फुटलेत त्यांना पदावरून दूर करावं'; मुंबई हायकोर्टात महत्वाची याचिका दाखल
मुंबई हायकोर्ट
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 7:43 PM

मुंबई : सध्या देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षात फूट होत आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका करण्यात आली आहे. यात जे पक्षातून फुटले आहेत, किंवा फुटतात त्यांना पदावरून तात्काळ दूर करण्यात यावे, त्याच प्रमाणे भारतीय घटनेच्या शेड्युल 10च पॅरा क्रमांक 4 हटवण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

काय आहे जनहित याचिका ?

सामाजिक कार्यकर्त्या मिनाक्षी मेनन यांनी मुंबई हायकोर्टात एक महत्वाची याचिका दाखल केली आहे. देश पातळीवर अनेक राजकीय पक्षात फूट पडत असते. गेल्या काही दिवसात महाराष्ट्र मध्ये ही मोठ्या प्रमाणात पक्ष फुटीच्या घटना घडल्या आहेत. प्रथम शिवसेना पक्षात फूट पडली.शिवसेनेचे 40 आमदार पक्षातून बाहेर पडले आहेत.त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे.त्यांचे ही जवळपास 40 आमदार फुटले आहेत.देशात पक्षांतर बंदी कायदा आहे. मात्र, या कायद्याच शेड्युल 10 च मुद्दा क्रमांक 4 हे पक्षांतरास प्रोत्साहन देणार कलम आहे.त्यामुळे हे कलम रद्द कराव, अशी याचिकेत मागणी केली आहे.

महत्वाचा या याचिकेत आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे.  तो म्हणजे ज्यांनी पक्षांतर केलं आहे. मात्र ज्यांनी शेड्युल 10 च पालन केले नाही.त्यांना कोणत्याही पदावर राहण्याचा अधिकार नाही. घटनेच्या शेड्युल 10 नुसार 2/3 आमदार पक्षातून बाहेर पडू शकतात. मात्र, बाहेर पडल्यावर त्यांना इतर कोणत्या तरी पक्षात जावं लागत. मात्र, महाराष्ट्र अस होताना दिसत नाही. पक्षातून फुटतात आणि आपलाच पक्ष मूळचा असल्याचं सांगतात. खर तर पक्षातून फुटल्यावर दुसऱ्या पक्षात जाण आवश्यक आहे.

विधानसभा अध्यक्ष ही त्याबाबत निर्णय घेत नाहीत. हा प्रकार म्हणजे शेड्युल 10 च उल्लंघन आहे.यामुळे एखाद्या फुटी बाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत नसतील तर महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींना त्या पदावरून दूर करावं, अशी ही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. दोन महत्त्वाच्या मुद्द्यावर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टात यावर लवकरच सुनावणी होणार आहे.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.