नाशिक : आज राज्यातील 34 जिल्ह्यातील सात हजार 135 ग्राम पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका या लिटमस टेस्ट म्हणून बघितली जात होती. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामध्ये राज्यात भारतीय जनता पार्टीहा पक्षा एक नंबरचा पक्ष ठरला असून दुसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आहे. याच दरम्यान मात्र, नाशिक जिल्ह्यात उलट घडलं आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष नंबर एकच्या स्थानी असून दुसऱ्या स्थानावर भारतीय जनता पार्टी आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आल्यानंतर या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने 196 ग्राम पंचायती पैकी 63 ग्रामपंचायतींवर विजय मिळवत जिल्ह्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे. तर भाजपने 55 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवत दुसरा नंबर पटकवला आहे. शिंदे गटाने 22 तर ठाकरे गटाने 28 ग्रामपंचायत काबीज करत आपल अस्तित्व कायम ठेवलं आहे.
विशेष म्हणजे संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेने देखील या निवडणुकीत दोन ग्रामपंचयातीवर आपले उमेदवार निवडून आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील मागील टप्प्यात झालेल्या निवडणुकीतही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा वरचष्मा राहीला होता, त्यात भाजपनेही चांगलीच ताकद लावल्याने त्यांची संख्या वाढली आहे.
भाजप आणि शिंदे गटाची युती आणि महाविकास आघाडी बघता महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यात वरचढ ठरली असून राष्ट्रवादीचाच बोलबाला नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे.
नाशिक जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या –
नाशिक जिल्हा एकूण ग्रामपंचायत 196 –
भारतीय जनता पार्टी – 55
बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट ) – 22
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (ठाकरे गट ) – 28
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 63
काँग्रेस – 08
माकप – 01
स्वराज्य संघटना – 02
इतर – 17