Nitin Gadkari | नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, दिल्लीत खळबळ

दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. विशेष म्हणजे अज्ञात आरोपींची मजल आता जास्त वाढताना दिसत आहे. त्यामुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे.

Nitin Gadkari | नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, दिल्लीत खळबळ
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 5:59 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन कॉलवर धमकी आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. अज्ञात आरोपींनी फोन करुन नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी देखील नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली. पण त्यानंतरही पुन्हा तसाच प्रकार समोर येताना दिसत आहे. गडकरींना पुन्हा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन कॉलवर धमकी देण्यात आली. संबंधित प्रकरण गंभीर असल्याने गडकरी यांनी तातडीने दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती दिली. नितीन गडकरी यांच्यासारखे दिग्गज आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री असलेल्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी कशी दिली जाऊ शकते? अशी चर्चा आता जोर धरु लागली आहे. दिल्ली पोलिसांनी संबंधित प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे.

हे सुद्धा वाचा

दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरु आहे. दिल्ली पोलीस फोन कॉलची चौकशी करत आहेत. पोलीस आरोपींना लवकर बेड्या ठोकतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपींना लवकर पकडून त्यांना योग्य शिक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान, नितीन गडकरी यांना याआधीदेखील धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गडकरी यांना सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांचं नेमकं कारण काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.

नितीन गडकरी यांना जानेवारी महिन्यात आली होती पहिली धमकी

नितीन गडकरी यांना जानेवारी महिन्यात पहिली धमकी आली होती. त्यानंतर मार्च महिन्यात नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे 3 फोन आले होते. धमकी देणाऱ्या आरोपींनी 10 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. तसेच धमकी देणाऱ्या आरोपीने स्वत:चं नाव जयेश पुजारी असल्याचं म्हटलं होतं.

नितीन गडकरी यांना 14 जानेवारीला धमकीचा सर्वात पहिला फोन आला होता हा फोन बेळगाव तुरुंगात गडकरी यांच्या कार्यालयात आला होता. धमकीवेळी आरोपीने स्वत:चं नाव जयेश पुजारी असं सांगितलं होतं. त्यानंतर दोन महिन्यांनी आलेल्या 3 धमक्यांच्या फोनमध्येही धमकी देण्यात आली आणि जयेश पुजारी असंच नाव सांगण्यात आलं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.