मुकेश अंबानी यांच्या जीवाला घोर, खंडणीसाठी पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Mukesh Ambani | दिग्गज उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे. दोनच दिवसात दुसऱ्यांदा त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शुक्रवारी 20 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. आता त्यांना पुन्हा खंडणी मागण्यात आली आहे.

मुकेश अंबानी यांच्या जीवाला घोर, खंडणीसाठी पुन्हा जीवे मारण्याची धमकी
Follow us
| Updated on: Oct 29, 2023 | 9:28 AM

नवी मुंबई | 29 ऑक्टोबर 2023 : दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकीचा ई-मेल आला आहे. शुक्रवारी त्यांना 20 कोटींची धमकी देण्यात आली होती. या धमकीला दाद न दिल्याने अनोळखी आरोपीने त्यांना पुन्हा धमकी दिली आहे. त्यांच्याकडे आरोपीने 200 कोटी रुपयांची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.शुक्रवारीच अंबानी यांना जीवे मारण्याच्या धमकीचा ईमेल आला होता. ज्यामध्ये आरोपीने अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली होती आणि जर पैसे दिले नाहीत तर आपला जीव मारण्याची धमकी दिली होती.

शार्प शूटर

शुक्रवारी उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचा ई-मेल आला होता. त्यात 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या खंडणीखोराने तो शार्प शूटर असल्याचा दावा मेलमध्ये केला आहे. या ई-मेलला प्रतिसाद न दिल्याच्या रागातून आरोपीने पुन्हा दुसरा मेल पाठवला आहे. ई-मेलला प्रतिसाद न दिल्याचा राग आरोपीने व्यक्त केला आहे. त्याने खंडणीची रक्कम वाढवली. आता 200 कोटी रुपये द्या अन्यथा मृत्यूच्या वॉरंटवर स्वाक्षरी केलेली आहे, अशी धमकी त्याने दिली आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांचा तपास सुरु

यापूर्वी धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. मात्र आरोपीने आणखी एक धमकीचा ईमेल आरोपीने केल्याने पोलिसाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे.

धमकीचे सत्र सुरुच

मुकेश अंबानी आणि अंबानी कुटुंबाला धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पण त्यांना धमकीचा फोन आला होता. दक्षिण मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांचे ‘अँटिलिया’ हे आलिशान घर बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली होती.

स्फोटकांनी भरलेली कार आढळली

फेब्रुवारी 2021 मध्ये मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली एसयुव्ही आढळली होती. दक्षिण मुंबईतील अंबानींच्या ‘अँटिलिया’ या आलिशान घराजवळ ही कार सापडली होती. त्यात 20 जिलेटिनच्या काड्या आणि एक पत्र सापडले. पत्रात मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी काही जणांना या प्रकरणात अटक केली होती. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.