पोलीसांच्या वाहनाला अपघात, मुंबई आग्रा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच
आयशरने चिरडल्याने तिघांचा मृत्यू झाला त्यातील दोघे सख्खे भाऊ होते, बोरटेंभे गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी ( नाशिक ) : नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर आपघातांची मालिका सुरूच आहे. रात्री नऊ वाजेच्या दरम्यान पहिल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. तर दूसरा अपघात पोलीसांच्या गाडीला झाला आहे. यामध्ये तीन पोलीस कर्मचारी जखमी आहे. तर तिसरा अपघात हा मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा झाला आहे. त्यामध्ये दहा मंजूर जखमी झाले आहे. त्यामुळे या तीन अपघातांनी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यामध्ये इगपुरी तालुक्यातील एकाच गावतील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पहिल्या अपघातात आयशरने टांगा घेऊन जाणाऱ्या चौघांना उडविले होते. त्यात तिघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. तर दुसरा अपघात हा पोलीसांच्या गाडीला झाला आहे. यामध्ये गाडी उलटल्याने संतोष भगवान सौंदाणे, सचिन परमेश्वर सुक्ले, रविंद्र नारायन चौधरी हे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर पहिल्या अपघातात इगतपुरी येथील बोरटेंभे गावतील प्रभाकर सुधाकर आडोळे, कुशल सुधाकर आडोळे आणि रोहित भगीरथ आडोळे हे जागीच ठार झाले आहेत.
आयशरने चिरडल्याने तिघांचा मृत्यू झाला त्यातील दोघे सख्खे भाऊ होते, बोरटेंभे गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
दुसऱ्या अपघातात नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जातांना हा अपघात झाला आहे. पोलिसांच्या वाहनाने तीनदा उलटल्या आहेत. तीन वाहनांचा हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी यांचे म्हणणे आहे.




या अपघातातील एक वाहन पसार झाले आहे. ह्या घटनेत नाशिक शहर दलाचे ३ पोलीस जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तर तिसऱ्या अपघातात वैतरणा धरणाजवळ मजुरांना घेऊन जाणारा टॅक्टर झाला आहे. ह्या अपघातात १० मजूर जखमी झाले असून सुदैवाने जीवित हानी टळली आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणाजवळ कॅनॉलच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला व पुरुष मजुरांना हा ट्रॅक्टर घेऊन जात होता. हा कॅनॉल बंद असल्याने जीवितहानी टळली.