टायगर अभी जिंदा है… नाथाभाऊंच्या जाहिरातीने खान्देशातील राजकारणात जोरदार चर्चा, Video
भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस वासी झाल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा प्रभाव कमी झाल्याचे बोलले जात होते. मात्र आता रक्षा खडसे यांच्या विजयानंतर समीकरणं बदलली असून जळगावच्या वर्तमानपत्रात आता एकनाथ खडसे यांच्यावर आलेल्या एका जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस वासी झाल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा प्रभाव कमी झाल्याचे बोलले जात होते. मात्र आता रक्षा खडसे यांच्या विजयानंतर समीकरणं बदलली असून जळगावच्या वर्तमानपत्रात आता एकनाथ खडसे यांच्यावर आलेल्या एका जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. टायगर अभी जिंदा है अशा आशयाची एकनाथ खडसे यांच्यासंदर्भातील एका जाहिरात आजच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली असून त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. खडसे मित्रपरिवार समर्थकांकडून ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना डीवचण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात पुन्हा वाक् युद्ध रंगू शकतं
काय आहे ही जाहिरात ?
जळगावच्या वर्तमानपत्रात एकनाथ खडसे मित्रपरिवार समर्थकांकडून एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ‘टायगर अभी जिंदा है’ असा डायलॉग लिहीलेली ही जाहिराच पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . एवढंच नव्हे तर ‘ एहसास से मजबूर ना समझो गुलशन से बहुत दूर ना समझो मुझको, मै आज भी इतिहास बदल सकता हू इतना भी कमजोर ना समजो मुझको’ असेही या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे. एका अर्थी एकनाथ खडसे यांचा करिश्मा आणि ताकद अद्याप अभेद्य असल्याचेच या जाहिरातीतून दर्शवण्यात आल्याचे दिसत आहे. रक्षा खडसे यांच्या विजयानंतर प्रकाशित झालेल्या या जाहिरातीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा रंगली आहे. रक्षा खडसे यांच्या विजयात एकनाथ खडसे यांच्याही मोठा वाटा असल्याने त्याच अनुषंगाने एकनाथ खडसे यांचा अद्यापही प्रभाव असल्यास जाहिरातीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
मात्र खडसे कोणत्या पक्षात आहेत, भाजप की राष्ट्रवादी शरद पवार गट असेही प्रश्न या जाहिरातीनंतर उपस्थित होत आहेत. या जाहिरातीच्या माध्यमातून महायुतीतील की महविकास आघाडीच्या विरोधक असा कुणाला टोला असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. पण गिरीश महाजन यांना उद्देशूनच ही जाहिरात असल्याची चर्चाही सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांचा प्रभाव कमी झाल्याच्या विरोधकांकडून गप्पा केला जात होत्या. त्यावर खडसे समर्थकांकडून जाहीरितच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.