Chandrapur शहरालगतच्या पद्मापूर कोळसा खाणीत वाघाचा शिरकाव; कामगारांमध्ये भीतीचे वातावरण
चंद्रपूर (Chandrapur) शहरालगतच्या पद्मापूर कोळसा खाणी(Coal Mine)त वाघा(Tiger)चा शिरकाव झालेला बघायला मिळाला. रात्रीच्या शिफ्टदरम्यान कामावर जात असलेल्या कामगारांना यामुळे धोका निर्माण झाला आहे.
चंद्रपूर (Chandrapur) शहरालगतच्या पद्मापूर कोळसा खाणी(Coal Mine)त वाघा(Tiger)चा शिरकाव झालेला बघायला मिळाला. रात्रीच्या शिफ्टदरम्यान कामावर जात असलेल्या कामगारांना यामुळे धोका निर्माण झाला आहे. दुचाकीवरून कामावर जात असलेल्या एका कामगारावर वाघाने चाल केली. आसपास असलेल्या अन्य कामगारांनी मदत केल्याने रात्री मोठा अनर्थ टळला. सरकारी कंपनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडची पद्मापूर कोळसा खाण ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राच्या अगदी शेजारी आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून बाहेर निघत असलेल्या वाघांसाठी ही महाकाय कोळसा खाण ठरली मोठा अडसर ठरली आहे. वाघांना भ्रमणमार्ग मिळत नसल्याने ते कोळसा खाण परिसरात अशी भटकंती करतात. वनविभाग व वेकोलि यांनी समस्येवर संयुक्तपणे उपाय शोधण्याची गरज व्यक्त होत आहे.
Latest Videos