वाघिणीला ठार करणाऱ्या शार्प शूटरची धारदार प्रतिक्रिया

विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ: नरभक्षक वाघीण ‘टी-वन’ला ठार करणारे शार्प शूटर अजगर अली यांनी सगळा थरार सांगितला. या वाघिणीला मारणं हा उद्देश नव्हता. तिला ठार केल्याने मला आनंद झाला असं नाही. उलट तिला जिवंत पकडले असते, तर बरं वाटलं असतं, असं टी वन वाघिणीला ठार करणारे शूटर अजगर अली यांनी टीव्ही 9 ला […]

वाघिणीला ठार करणाऱ्या शार्प शूटरची धारदार प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ: नरभक्षक वाघीण ‘टी-वन’ला ठार करणारे शार्प शूटर अजगर अली यांनी सगळा थरार सांगितला. या वाघिणीला मारणं हा उद्देश नव्हता. तिला ठार केल्याने मला आनंद झाला असं नाही. उलट तिला जिवंत पकडले असते, तर बरं वाटलं असतं, असं टी वन वाघिणीला ठार करणारे शूटर अजगर अली यांनी टीव्ही 9 ला सांगितलं.

अजगर अली म्हणाले, “नरभक्षक वाघिणीची माहिती बोराटी गावातील ग्रामस्थांनी दिली होती. जिल्ह्यातील राळेगावात शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. बोराटी गावचे शेतकरी बाजारासाठी जात असताना त्यांना टी वन वाघीण रस्त्यावर दिसली होती. नागरिकांनी वन विभागाला याबाबतची माहिती दिली. वन विभागाने या भागात गस्त वाढवली आणि कॅमेरे लावले. तिला ट्रॅप करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. आम्ही तिला बेशुद्ध करुन पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ती चवताळून आमच्या जिप्सी गाडीवर धावून आली. त्यावेळी आम्हाला आमच्या बचावासाठी तिला गोळी मारावी लागली. तिला मारणे हा उद्देश नव्हता, तिला मारल्याने मनाला आनंद होत नाही, तिला जिवंत पकडलं असतं, तर बरं वाटलं असतं” विवेक गावंडे यांनी

वाघिणीचा खात्मा

तब्बल 13 जणांची शिकार करणाऱ्या नरभक्षक टी-1 वाघिणीचा खात्मा करणाऱ्यात अखेर दीड महिन्यांनी यश आलं. शार्प शूटर अजगर अलीने शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास टी-1 वाघिणीला अचूक टिपत तिला गतप्राण केलं. टी-वाघिणीचा खात्मा होताच, गेल्या अनेक दिवसांपासून भयभीत अवस्थेत जगणाऱ्या यवतमाळच्या राळेगावातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडत एकच जल्लोष केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.