लातूर : शिक्षण क्षेत्रात (Latur) ‘लातूर पॅटर्न’ ला तोडच नाही. याच शैक्षणिक पंढरीत शिक्षणाचे धडे घेतलेल्या आयएएस (Pradeep Gawande) प्रदीप गावंडे यांच्या लग्नाची चर्चा सबंध राज्यात सुरु आहे. आता एका आयएएस चे लग्न त्यात चर्चा काय? असा सवाल तुम्हाला पडला आहे. मात्र, याला कारणही तसेच आहे. मूळचे लातूरचे असलेले प्रदीप गावंडे हे आयएएसच असलेल्या (Tina Dabi) टीना डाबी यांच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहेत. टीना डाबी ह्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या परिक्षेत भारताततून पहिल्या आल्या होत्या. टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांची प्रेमकथाही तेवढीच रंजक आहे. लातूर-जयपूर व्हाया औरंगाबाद असा हा त्यांच्या प्रेम कहाणीचा प्रवास आहे. अखेर त्यांच्या लग्नाची तारिख ठरली आहे. प्रदीप यांचे नातेवाईक पुणे, मुंबई आणि मराठवाड्यात असले तरी हा लग्न सोहळा जयपूर येथे 22 एप्रिल रोजी पार पडणार आहे. तर 24 एप्रिला पुणे येथे रिसेप्शन दिले जाणार आहे. ह्या त्यांच्या लग्नाबद्दल टीना डाबी यांनीच इंस्टाग्रमवर माहिती दिली आहे. हे दोघेही आयएएस असले तरी दरम्यानचा कोरोनाचा काळच यांच्या प्रेम काहणीचे निमित्त ठरला आहे.
2021 च्या दुसऱ्या कोरोना लाटेत सर्व देश या रोगराईचा सामना करीत होते. शिवाय याच काळात रुग्णसेवा करण्याची संधी टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांना मिळाली होती. राज्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन सिलेंडरच्या वितरणाची जबाबदारी ही त्यांच्यावर होती. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे हताळलीच पण याच काळात एकमेकांशी त्यांची चांगली ओळखही झाली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर अखेर प्रेमात झाले. याविषयी प्रदीप गावंडे म्हणाले की,टीना डाबी यांचा विनम्र स्वभाव आणि दयाळूपणा मनाला भावला आणि तिथूनच आमच्या प्रेम कहाणीला सुरवात झाली. शिवाय आपणच टीनाला प्रपोज केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोना काळ सर्वांसाठी कठीण होता तर हाच काळ या दोघांसाठी फळाला आला आहे.
प्रदीप गावंडे हे टीना डाबी यांच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठे आहेत. शिवाय त्यांचा हा दुसरा विवाह असल्याची चर्चा देखील सोशल मिडियावर होत होती. पण याबाबत प्रदीप यांनीच स्पष्टीकरण दिले असून आपण पहिल्यांदाच विवाह बंधनात अडकणार असल्याचे सांगितले आहे. हे दोघेही राजस्थानात कर्तव्य बजावत असल्याने आता राजस्थानच्या राजधानीतच त्यांच्या लग्नाचा बार उडणार आहे. 22 एप्रिल रोजी ते लग्न बंधनात अडकणार आहेत. त्याअनुशंगाने सर्व तयारी झाली आहे. प्रदीप गावंडे यांचे नातेवाईक हे मराठवाडा, पुणे आणि मुंबईतच असल्याने 24 एप्रिला पुण्यात रिसेप्शन देणार आहेत.
टीना डाबी यांचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्या आएएस अतहर आमीर यांच्याशी त्या विवाहबध्द झाल्या होत्या.मात्र, त्यांच्या नात्यातील दुरावा हा वाढत गेला आणि घटस्फोट घेऊन विभक्त झाल्या आहेत. त्यामुळे जीवनात दुसरी संधी ही मिळतेच. एखादे नाते जास्त दिवस टिकणारे नसले तर त्याचे ओझे न स्वीकारता ते वेळीच तोडलेले बरे असते. असाच निर्णय मी घेतला असून आता आयुष्याची दुसरी इंनिंग चांगली होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रदीप गावंडे हे मूळचे लातूरचे आहेत. याच ‘लातूर पॅटर्न’मध्ये त्यांनी शिक्षणाचे धडे घेतले आहे. आज जरी ते आएएस असले तरी शिक्षणाचा पाया हा लातूरच्या मातीतलाच आहे. त्यांनी इयत्ता 12 वी पर्यंत त्यांनी लातूरातील राजश्री शाहू महाविद्यालयात विज्ञान या शाखेतून शिक्षण पूर्ण केले.तर पुढील वैद्यकीय शिक्षण औरंगाबाद शासकिय वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटी रुग्णालयातून पूर्ण केले होते. यानंतर 2013 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली असून ते आता राजस्थानात केडरचे अधिकारी म्हणून सनदी सेवेत आहेत. सुशिक्षित घराणे आणि त्यांची आई सत्यभामा गावंडे ह्या शिक्षिका होत्या याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावरही झाला होता. एवढेच नाही तर प्रदीप यांचे दोन भावंडे हे देखील वैद्यकीय क्षेत्रामध्येच आहेत.